Monday, April 29, 2024
Homeनाशिकउद्यापासून नाशकात असे असतील निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

उद्यापासून नाशकात असे असतील निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सरकारने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. राज्यात दुकानांना (Shops) रात्री ८ वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी केली. शासनाच्या याच आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून नाशिक जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik District Collector Suraj Mandhare) यांनी दिली आहे…

- Advertisement -

यानुसार सलून, ब्युटी पार्लर, स्पा, जिम हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे.

शिवाय वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यभरात धार्मकस्थळे ही बंदच असणार आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्सदेखील पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहेत. कृषी, औद्योगिक, नागरी, दळणवळणाची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याशिवाय जी कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेदेखील सांगण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मागील बैठकीमध्ये जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच कायम ठेवण्याचा निर्णय झालेला होता. दरम्यान शासनस्तरावरून नव्याने काही निर्देश आल्यास ते जिल्ह्यात लागू करण्यात येतील असेही ठरविणेत आले होते. शासनाकडून प्राप्त आदेश जिल्ह्यात जसेच्या तसे लागू करण्यात येत आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू करण्यात येत आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या