महापालिका मुख्यालयात नागरिकांच्या चकरा मारणे कमी होणार

महापालिका मुख्यालयात नागरिकांच्या चकरा मारणे कमी होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक (Commissioner and Administrator in Nashik Municipal Corporation ) म्हणून मुंबईहून आलेले रमेश पवार ( Ramesh Pawar )यांनी प्रशासनात शिस्त लावण्याचा प्रयत्न करताना नागरिकांना कमी अंतरावरच त्यांच्या कामाचा निपटारा व्हावा, यादृष्टीने नियोजन करण्याचे ठरविले आहे .

याचाच एक भाग म्हणून शहरातील सहाही विभागात असलेले महापालिकेचे विभागीय अधिकारी (Divisional Officer of Municipal Corporation ) यांच्या अधिकारात वाढ करून नागरिकांच्या कामांचा निपटारा त्यांच्यात पातळीवर करण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी विशेष समितीचे गठण करण्यात आले असून त्यांचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर झाल्यावर त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे.

महापालिका आयुक्तांनी सध्या नाशिक शहरातील सहा विभागांचे दोन झोन तयार केले आहे. एका झोनमध्ये तीन विभागीय अधिकारी राहणार आहे तर दुसर्‍या मध्ये देखील तीन अधिकारी आहे. विभागीय अधिकार्‍यांच्या अधिकारात वाढ करून दिल्यानंतर नागरिकांच्या अनेक कामे त्यांच्या विभागीय स्तरावर होणार आहे, जी कामे विभागीय स्तरावर झाली नाही ते झोन स्तरावर होणार आहे.

दोन्ही स्तरावर कामे होणार नाही ते उपायुक्त आणि आयुक्त यांच्यापर्यंत जाणार आहे. यामुळे किरकोळ कामे लवकरात लवकर निपटारा होणार आहे व काही तांत्रिक अडचण आल्यास नागरिकांना पुढे जाता येणार आहे. यामुळे कामात सुटसुटीतपणा येऊन नागरिकांना चांगल्या सुविधा देखील महापालिकेच्यावतीने मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त रमेश पवार यांनी या संदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपायुक्त घोडे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली समिती तयार करणेत येउन अहवाल तयार करण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

विभागीय अधिकार्‍यांच्या अधिकारात वाढ झाल्यानंत सर्वसामान्य नागरिकांना राजीव गांधी मुख्यालयात चकरा मारण्यातून सुटका होणार आहे. सध्या अगदी छोट्या छोट्या कामासाठी नागरिकांना पालिकेचे मुख्यालय गाठावे लागते. परंतु विभागीय अधिकार्‍यांया अधिकारात वाढ झाल्यानंतर बहूतेक कामांची अकार्यवाही विभागीय कार्यालयातून होणार आहे. विभागीय अधिकार्‍यांना अधिकार देण्यासाठी उपायुक्त घोडे पाटील यांच्या अध्यतेखाली अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे,नगररचनाचे अग्रवाल, विभागीय अधिकारी मेनकर, पाणी पुरवठ्याचे चव्हाणके व वैद्यकीय विभागाचे नागरगोजे यांची समिती स्थापण केली आहे. लवकरच ही समिती आपला अहवाल आयुक्तांना सादर करणार आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अवैध नळ कनेक्शन यांसारख्या बाबींना लगाम लावण्यासाठी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी विभागिय अधिकार्‍यांच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकार्‍यांना कशा प्रकारे अधिकार द्यावेत यासाठी समिती स्थापीत केली आहे.

Related Stories

No stories found.