इंधन, खतांच्या दरवाढी विरोधात राज्यभर निषेध आंदोलन करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती
इंधन, खतांच्या दरवाढी विरोधात राज्यभर निषेध आंदोलन करणार

मुंबई । प्रतिनिधी

इंधन आणि खतांच्या भरमसाठ दरवाढीविरोधात राज्यभर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी दिली. शेतकऱ्यांवर वेगवेगळया प्रकारचा बोजा लादणाऱ्या केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.

पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. असा आरोप पाटील यांनी केला.

१०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी तर डीएफएची किंमत ७१५ रुपयाने वाढली आहे. डीएफए अगोदर १ हजार १८५ रुपयांना मिळत होते, त्याची किंमत आता १ हजार ९०० रुपये झाली आहे.

१०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला १ हजार१७५ ऐवजी १ हजार ७७५ रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत .देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकारने केले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com