तालुक्याच्या ठिकाणी होणार परिपूर्ण प्रसुतीगृह

तालुक्याच्या ठिकाणी होणार परिपूर्ण प्रसुतीगृह
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात मातामृत्यू ( Maternal mortality rate )प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे ( health administration ) पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात (government hospital ) असलेला शस्त्रक्रिया विभाग विकसित करण्यास लवकरच सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील मातामृत्यू दर राज्याच्या प्रमाणात जास्त आहे. हा कमी करण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावरील रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये असलेले हे प्रमाण का वाढत आहे याचा मागोवा घेतल्यानंतर गरोदर स्त्रीला वेळेवर उपचार मिळत नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे अगदी अंतिम टप्प्यात प्रसुतीसाठी महिला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचत होत्या.

दुर्दैवाने काही वेळा महिलेला मृत्यूला कवटाळावे लागत होते. यासारख्या घटना यापुढे घडू नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणीच असलेला विभाग विकसित करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भुलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यक आणि इतर स्टाफ यांची प्राधान्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. यासोबतच गावाच्या परिघात रुग्णवाहिका सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

सध्या जिल्ह्यात मालेगाव येथे एक सामान्य रुग्णालय, कळवण, त्र्यंबक, चांदवड आणि निफाड अशी चार उपजिल्हा रुग्णालये आणि 108 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी आढावा घेऊन ग्रामीण भागात जे सोयीस्कर असेल तेथील रुग्णालय विकसित करण्यात येणार आहे.

मातामृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. लवकरच त्या संदर्भात सूक्ष्म नियोजन केले जाईल. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत आपण उपाययोजना करत होतो. येत्या काही दिवसात कोरोनाची आकडेवारी वाढली नाही तर लवकरच यावर काम सुरू होईल.

डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक ( Dr. Ashok Thorat, District Surgeon, Nashik )

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com