प्रभाग 2 : आजही विकासाची बोंब

प्रभाग 2 : आजही विकासाची बोंब

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

आडगाव (Adgaon), नांदूर-मानूर (Nandur-Manur), बिडी कामगारनगर (Bidi Kamgar Nagar), कोणार्कनगर (Konarknagar) असा ग्रामीण आणि कॉलनी परिसर असा संमिश्र प्रभाग 2 असून आजपर्यंत येथील मतदारांनी बहुतांश सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना (Corporators) काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मात्र आजदेखील विकासकामांच्या नावाने बोंब आहे. ठराविक भागातच मूलभूत सुविधा उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत...

रस्त्याची दुरवस्था

  • नवीन वसाहती, कॉलनी परिसर, मळे परिसर रस्त्यापासून वंचित, अंतर्गत रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा. गावठाण भागात चिखलाचे साम्राज्य.

  • विडी कामगारनगर, दिगंबर हाऊसिंग सो. परिसरात मोकाट कुत्रे, डुकरांचा त्रास.

नांदूर गाव विकासापासून कोसो दूर; मानूर गावाला मूलभूत सुविधांची प्रतीक्षा

उद्यान दुरवस्था : कॉलनी परिसरात शोभेचे उद्यान, लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था, गवताचे साम्राज्य, संरक्षक भिंतीचे नुकसान.

साथीच्या आजारांत वाढ : निलगिरी बागसह कॉनॉल यासह प्रभागात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यांसारख्या आजाराची साथ. धूर, औषध फवारणी काही भागातच.

पाणी - आडगाव, जुना भगूर म्हळोबा बिरोबा परिसर, गंगापूर कॉनॉल 6 व 7 नंबर चारी येथे जलवाहिनी नाही. मळे विभागात पाण्याची समस्या.

पथदीप - आडगाव - म्हसरूळ रोडवर पोल आहेत, मात्र पथदीपांची प्रतीक्षा. मळे विभाग अंधारात.

  • आडगाव परिसरातील कब्रस्थानजवळील स्वच्छतागृहाची दुरवस्था

  • आडगाव गावातील दगडोबा मंदिराजवळील पूल आणि आडगाव- जुना भगूररोड वळणचा रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने वाहनचालकांना समोरील वाहने दिसत नसल्याने अपघातास आमंत्रण.

  • आडगाव फाटा परिसरात सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावर.

  • आडगाव व लेंडी नाला रस्त्याची दुरवस्था.

  • आडगाव येथील दशक्रिया शेड विधीची दुरवस्था.

  • आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्या.

  • गणेश कॉलनी, शरयू पार्क परिसरात पावसाळी पाण्याचा प्रश्न प्रलंबित.

  • कोणार्कनगर- छावा चौक, निवृत्तीनगर, जत्रा चौफुली, स्वामी समर्थनगर, गणेश कॉलनी शरयू पार्क, धात्रक फाटा, वृंदावननगर, श्रीरामनगर परिसरात औषध फवारणी नाही.

प्रभाग 2 कडे स्थायी समिती सभापती तसेच प्रभाग सभापती अशी पदे असतानादेखील आडगाव परिसर आरोग्य केंद्रासाठी वंचितच आहे. गावातील भगूर रोडवरील पथदीप, गावठाणतील रस्ते, सांडपाण्याचा सततचा नेत्रावती नदीत असलेला विसर्ग, एकमेव महालक्ष्मी उद्यानाची झालेली दुरवस्था, नाशिक मनपा शाळेजवळ तसेच महालक्ष्मी उद्यानाजवळ उघड्यावर पडलेला कचरा यामुळे पसरणारी दुर्गंधी हा चिंतेचा विषय आहे. गावातील सुलभ शौचालयाची दुरवस्था, साचलेले सांडपाणी याकडे स्थानिक प्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांना आरोग्याची चिंता वाटू लागली आहे.

- अतुल शंकरराव मते

प्रभाग हा ग्रामीण भाग व नवीन कॉलनी वसाहत असा संमिश्र भाग असून नगरसेवक हे ग्रामीण भागातीलच निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला स्थानिक नेतृत्व नाही. त्यामुळे आम्हाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, लाईटच्या समस्या, कचरा समस्या निर्माण होतात. परिसरात डासांचे प्रमाण जास्त वाढले आहे. कोणार्कनगर परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक नेतृत्व उदयाला येणे गरजेचे आहे. तरच परिसरातील विकास साधला जाऊ शकतो.

- रामभाऊ प्रभाकर संधान

Related Stories

No stories found.