Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात 'इतका' पाणीसाठा शिल्लक

जिल्ह्यात ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात यंदाच्या मोसमात सर्व दूर समाधानकारक पावसाबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीही (heavy rain) देखील झालेली आहे.

- Advertisement -

त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील सिंचनाचा (irrigation) लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी (farmers) आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील विविध मोठे प्रकल्प व मध्यम प्रकल्प अशा एकूण 24 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 84 टक्के इतका पाणीसाठा (water stock) उपलब्ध आहे.

यामुळे या धरणांच्या लाभक्षेत्रातील रब्बी (rabbi) व उन्हाळा हंगाम हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने फायदेशीर राहणार असे चित्र आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी (heavy rain) झाली तर पूर्व भागात समाधानकारक पाऊस यावर्षी झालेला आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी काही भाग वगळता अजूनही समाधानकारक आहे.

त्यामुळे खरीपानंतर रब्बीचा हंगाम (rabbi season) समाधानकारक आहे. उन्हाळी हंगामाला आता सुरुवात झाली असून लागवडीची कामे जोमाने सुरू असून काही भागात ती पूर्णत्वास आली आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे प्रकल्प मिळून एकूण 24 प्रकल्प आहेत. गंगापूर धरण (gangapur dam) समूहात चार, पालखेड धरण (palkhed dam) समूहात 13 तर गिरणा खोरे धरण समूहात सात असे एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 एकूण 24 प्रकल्प आहेत. यापैकी गंगापूर धरण समूहामध्ये गतवर्षी इतकाच म्हणजे 81 टक्के इतका पाणीसाठा आहे.

पालखेड धरण समूहामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक असून गतवर्षी तो 50 टक्के इतका होता तर यावर्षी 86 टक्के इतका म्हणजेच या धरण समूहामध्ये गतवर्षाच्या तुलनेत 36 टक्के पाणीसाठा अधिक आहे. गिरणा खोरे धरण समूहातही अशीच परिस्थिती असून गतवर्षी या धरण समूहामध्ये 99 टक्के इतका पाणी साठा होता तर तो यावर्षी आतापर्यंत 95 टक्के इतका आहे. एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 अशा 24 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी पहाता ती या वर्षी आतापर्यंत 84 टक्के इतकी आहे. ती गतवर्षी 85 टक्के इतकी होती.

प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा पुढील प्रमाणे – दशलक्ष घनफुटामध्ये गंगापूर (4706), कश्यपी ( 1768),गौतमी गोदावरी (1166), आळंदी (633),पालखेड (460),करंजवण (4530),वाघाड (1775), ओझरखेड (1886),पुणेगाव (547), तिसगाव (381), दारणा (5489), भावली (1373), मुकणे (6426),वालदेवी (1055), कडवा (1542), नांदूर मध्यमेश्वर ( 243), भोजापूर (310), चणकापूर( 2363), हरणबारी (1020), केळझर( 495), नागासाक्या ( 320), गिरणा (15021), पुनद (1296), माणिकपुंज(257) एकूण 55 हजार 62 दशलक्ष घनफूट.84 टक्के.

- Advertisment -

ताज्या बातम्या