Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील धरणांमध्ये 'इतका' पाणीसाठा शिल्लक

जिल्ह्यातील धरणांमध्ये ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मान्सूनचे केरळात आगमन तब्बल आठ दिवस उशिराने झाले आहे. परिणामी देशभर उन्हाची तीव्रता विशेषत: महाराष्ट्रामध्ये अधिक जाणवत असून उपलब्ध पाणीसाठाही कमी होत आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ 25 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनास अजूनही आठ ते दहा दिवसांचा अवधी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणखी जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मागील मोसमात सर्वदूर समाधानकारक पावसाबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा टिकून होता. मात्र, मान्सूनचे लांबलेले आगमन, त्यातच पूर्व मान्सूननेही फिरविलेली पाठ आणि पडत असलेले तीव्र ऊन यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील विविध मोठे सात प्रकल्प व मध्यम सतरा प्रकल्प अशा एकूण 24 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 16 हजार 689 दशलक्ष घनफूट म्हणजेच 25 टक्के पाणीसाठा आहे.गतवर्षी तो आजपर्यंत 17 हजार 947 दशलक्ष घनफूट म्हणजेच 27 टक्के पाणीसाठा होता.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील मोसमात अतिवृष्टी झाली तर पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी काही भाग वगळता समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम समाधानकारक राहिला. उन्हाळी हंगामही सुरू आहे.

जिल्ह्यात छोटे-मोठे प्रकल्प मिळून एकूण 24 प्रकल्प आहेत. यामध्ये गंगापूर धरण समूहात चार, पालखेड धरण समूहात 13 तर गिरणा खोरे धरण समूहात सात असे एकूण सात मोठे प्रकल्प व 17 मध्यम प्रकल्प असे एकूण 24 प्रकल्प आहेत. यापैकी गंगापूर धरण समूहामध्ये 26 टक्के इतका पाणीसाठा आहे. पालखेड धरण समूहामध्ये 14 टक्के पाणीसाठा आहे.गिरणा खोरे धरण समूहात 24 टक्के इतका पाणीसाठा आहे. एकूण मोठे प्रकल्प सात व मध्यम प्रकल्प 17 अशा 24 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणी साठ्याची आकडेवारी पहाता ती यावर्षी आतापर्यंत 27 टक्के इतकी आहे.

प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे – दशलक्ष घनफूटमध्ये

गंगापूर (2096) 37 टक्के, कश्यपी (284) 15 टक्के, गौतमी गोदावरी (185) 10 टक्के, आळंदी (51) 6 टक्के, पालखेड (298) 46 टक्के, करंजवण (740) 14 टक्के, वाघाड (161) 7 टक्के, ओझरखेड (551) 26 टक्के, पुणेगाव (87)14 टक्के, तीसगाव (18) 4 टक्के, दारणा (2296) 32 टक्के, भावली (125) 9 टक्के, मुकणे (2817) 39 टक्के, वालदेवी (239) 21 टक्के, कडवा (377) 22 टक्के, नांदूरमध्यमेश्वर (216) 84 टक्के, भोजापूर (55) 15 टक्के, चणकापूर (678) 28 टक्के, हरणबारी (412) 35 टक्के, केळझर (199) 35 टक्के, नागासाक्या (0) 0 टक्के, गिरणा (4353) 24 टक्के, पुनद (451) 35 टक्के, माणिकपुंज (0) 0 टक्के. एकूण 16,689 दशलक्ष घनफूट 25 टक्के.

- Advertisment -

ताज्या बातम्या