Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउद्या निम्या शहरात पाणीबाणी

उद्या निम्या शहरात पाणीबाणी

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर ( Satpur ) विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून ( Water Filtration Plant )सुरु होणारी सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी 1200 मी. व्यासाची पी. एस. सी. सिमेंटची मुख्य वाहिनीला सातमाऊली चौक, महिंद्रा कंपनी कंपाऊंडलगत व त्र्यंबकरोड डेमोक्रेसी मंगल कार्यालय येथील चौकात पाणी गळती सुरु झालेली आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुधवारी(दि.20) सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील पाणीपूरवठा बुधवारी बंद (Water supply closed ) राहणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे शहरातील सातपूर प्रभाग, नवीन नाशिक प्रभाग व भागश: नाशिक पश्चिम विभागातील प्रभागात बुधवारी (दि.20) पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार (दि.21) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपूर्ण परिसरम्हणजेच प्र. क्र. 8, 9, 10, 11, 26 व प्र. क्र. 27 मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौकतसेच नाशिक पश्चिम विभागातील प्र.क्र. 7 मधील नहुष सोसायटी परिसर, पुर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर, गीतांजली सोसायटी, पंपीग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरातपाणी पूरवठा बंद राहील.

प्र.क्र. 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर कामगार नगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटे नगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गडकरीची चौक व गायकवाड नगर परिसर इत्यादीभागातही परिणाम होणार आहे.

नविन नाशिक विभागातील प्र. क्र. 25 (भागश परिसर) इंद्रनगरी परिसर, कामठवाडा, धन्वतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मी नगर, दत्त नगर, मटाले नगर, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गडकरीची चौक व गायकवाड नगर परिसर पाणी मिळणार नाही.

प्र. क्र. 28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर या भागाला पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या