महापालिकेत डॉक्टर, नको रे बाबा!
मुख्य बातम्या

महापालिकेत डॉक्टर, नको रे बाबा!

नाशिक मनपा भरतीकडे उमेदवारांची पाठ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा वाढता संसर्ग लक्षात घेत शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडुन 180 डॉक्टर्स, 250 स्टाफ नर्स यासह इतर विविध पदांसाठी थेट मुलाखत प्रक्रिया सुरू झाली असुन यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात करोनामळेे डॉक्टर पुढे यात नसल्याचे तिसर्‍यांदा समोर आले आहे. यामुळे आता महापालिकेकडुन डॉक्टरांसह इतर पदावरील उमेदवारांना आकर्षीत करण्यासाठी तीन महिन्याच्या पॅकेजमध्ये घसघसीत वाढ देखील करण्यात आली आहे. मात्र अद्यापही भरतीला प्रतिसाद मिळताना दिसून येत नाहीये.

आजपासुन महापालिकेच्या वैद्यकिय विभागात करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यासाठी 180 डॉक्टर, 250 स्टॉफ नर्स यासह पदाची भरती प्रक्रिया नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात सुरु झाली आहे.

मात्र, या भरतीस डॉक्टरांकडुन फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या मे व जुन महिन्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडुन डॉक्टरांच्या दोनदा झालेल्या भरतीस फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. अशीच स्थिती आता महापालिका प्रशासनाच्या डॉक्टर भरतीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसापासुन सुरू झालेल्या भरतीकडे डॉक्टर, नर्स, पॅरामेडीकल स्टाफ यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यामुळे आता महापालिकेने या पदांकरिता जाहीर केलेल्या मानधनात घसघसीत वाढ केली आहे. करोनाच्या लढ्यात आकर्षक मानधन देऊन डॉक्टर पुढे यावेत अशी भूमिका या मागे आहे.

गेल्या दोन दिवसांच्या भरतीत वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस) 50 जागांसाठी केवळ 1 डॉक्टर हजर झाले आहे. तसेच आयुष वैद्यकिय अधिकारी (बीएमएएस) 100, जागांसाठी केवळ 22 डॉक्टर आले आहे.फिजीशियन 10 जागांसाठी व भुलतज्ज्ञांच्या 10 जागांसाठी कोणीच आले नाही. अशीच स्थिती इतर पदांच्या बाबतीत झाली आहे.

अशाप्रकारे डॉक्टरांनी करोना विरुध्दच्या लढ्याकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. या भरतीचा दुसर्‍या टप्पा पुन्हा 29 जुलैपासुन सुरू होणार आहे. यामुळे आता डॉक्टरांसह इतर पदांच्या उमेदवारांना आकर्षीत करण्यासाठी त्यांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाढीव मानधनामुळे तरी डॉक्टरांनी करोनाविरुध्दच्या लढ्यात सहभागी व्हावेत अशी अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.

असे वाढविण्यात आले मासिक मानधन

पद नाव अगोदरचे मानधन आता जाहीर मानधन

वैद्य. अधि. (एमबीबीएस) 60,000 रु. 100,000 रु.

फिजीशियन (एम. डी.) 150,000 रु. 300,000 रु.

भुलतज्ज्ञ 75,000 रु. 100,000 रु.

वैद्य. अधिकारी (बीएमएएस) 40,000 रु. 60,000 रु.

रेडीओलॉजीस्ट 75,000 रु. 100,000 रु.

ए. एन. एम. 8650 रु. 15000 रु.

Deshdoot
www.deshdoot.com