Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात जनता कर्फ्युमुळे लॉकडाऊनची गरज नाही

नाशकात जनता कर्फ्युमुळे लॉकडाऊनची गरज नाही

नाशिक । प्रतिनिधी

संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून तिला गती देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने व उद्योगधंदे सुरू राहीले पाहीजे.

- Advertisement -

शहरात व्यावसायिक व व्यापारी हे करोनाचा संसर्ग टाळावा यासाठी स्वयंफुर्तीने पुढे येऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरु ठेवत आहे.

सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत नागरिक स्वयंशिस्त पाळत जनता कर्फ्युचे पालन करत आहे. जनता कर्फ्यु लागू असताना शहरात लाॅकडाऊनची आवश्यकता नसल्याचा पुनर्उच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा केला.

पालकमंत्री भुजबळ यांनी शनिवारी (दि.४) क्रेडाई व महापालिका यांच्यातर्फ़े ठक्करडोम येथे उभारण्यात आलेल्या ३५० खाटांच्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. निमातर्फे आॅक्सिजनची व्यवस्था केली जाणार आहे.

इतर आवश्यक साधने शासनाच्यावतीने उपलब्ध करुन दिली जातील. उभारण्यात आलेले कोव्हिड सेंटर ही आपातकालीन यंत्रणा असल्याचे भुजबळ म्हणाले.

या सेंटरमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता व ड्रेनेज यांची योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. परिसरातील रहिवाशांना या सेंटरपासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे.

तसेच स्त्री व पुरूष, आरोग्य सेवक, पोलीस यंत्रणा यांच्यासाठी वेगवेगळी स्वच्छता गृह उभारणे, चांगल्या प्रतीची भोजन व्यवस्था करणे, रिक्रिअेशन रूममध्ये पेशंटचे मन रमेल यासाठी टिव्ही, मोबाईल व दुरध्वनी यांची व्यवस्था करणे जेणेकरून रूग्ण आपल्या घरच्या लोकांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संपर्क करू शकतील.

कॅरम बोर्ड, बुद्धीबळ आदी बैठेखेळ उपलब्ध करून देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. शहरातील रुग्णालयात पुरसे बेड उपलब्ध आहे. खासगी हाॅस्पिटल अधिग्रहित करण्याचे अधिकार हे जिल्हाप्रशासन व महापालिका आयुक्तांना आहेत.

आरोग्य सेवक, पोलिस कर्मचारी या संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, त्यांच्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर त्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी हॉस्पिटल संदर्भात सातत्याने अवाजवी बीलासंदर्भात तक्रारी येत असतील, तर त्यांची शहानिशा करून व सत्यता पडताळून कारवाई करण्याचे संपुर्ण अधिकारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या