'रेपो दरा'त RBI कडून कोणतेही बदल नाही

पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास यांनी दिली माहिती
'रेपो दरा'त RBI कडून कोणतेही बदल नाही

दिल्ली | Delhi

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे.

यानुसार रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यात रेपो रेट 4.2% तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम ठेवण्यात आला आहे. RBI ची सलग 3 दिवस सुरु असलेली ही बैठक आज संपणार आहे. त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले. RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी घेतलेल्या बैठकीत व्याज दरांत काही विशेष बदल करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरबीयआयच्या मॉनिटरी पॉलिसी ने व्याज दरात काही विशेष बदल केले नसून EMI मध्येही विशेष सवलत देण्यात आलेली नाही. डिसेंबर २०२० पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली. भारतीय वित्तीय बाजारातील तरलता वाढविण्यासाठी काही क्षेत्रांना आर्थिक मदत देणं, निर्यातीस चालना देणं आणि पेमेंट सर्व्हिस सिस्टमच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास सुलभता निर्माण करून देणं यासारख्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोलाची मदत केली जात आहे. मार्च २०२२ पर्यंत रिझर्व्ह बँकेनं एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद केली आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी RBIने परदेशी खरेदीदारांशी करार करण्यासाठी अधिक सुविधा जाहीर केल्या आहेत. सिस्टम आधारित ऑटोमॅटिक कॉशन लिस्टिंगच्या मदतीनं याप्रकरचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “करोना संकटामुळे देशात निर्माण झालेली भीती आणि निराशेचे वातावरण आता आशेत बदलू लागलं आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होऊ शकते आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे,” असं दास म्हणाले. तसंच सुरू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहू शकतो. तसंच निरनिराळ्या क्षेत्रांसोबतच भारतात तेजीनं आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. कृषी, कंझ्युमर गूड्स, वीज आणि औषध क्षेत्रात तेजीनं वाढ होण्याची शक्यताही दास यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com