Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

देशात किंवा महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण (Monkeypox patient)आढळलेला नाही. त्यामुळे मंकीपॉक्स विषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग होत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

राज्यामधील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथे करोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय कोरोना रूग्ण सध्या राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रूग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. तथापि, जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

पावसाळी आजारांची काळजी

पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात, असेही राजेश टोपे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या