Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या... तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल : मंत्री भुजबळ

… तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल : मंत्री भुजबळ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

इतर मागसवर्ग (ओबीसी) समाजाच्या इम्पिरिकल डेटाबाबत ( Imperical Data Of OBC Community ) वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या धक्कादायक आहेत. आडनावावर ( Last Name ) जाऊन घरात बसून कोण माहिती घेत असेल तर हे चुकीचे आकडे येतील. हे चुकीचे आकडे ओबीसींसाठी अडचणीचे ठरतील आणि ओबीसींची कत्ल होऊन जाईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal)यांनी बुधवारी व्यक्त केली.

- Advertisement -

ओबीसी डेटाबाबत खोलात जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आऊटसोर्सिगचे जे काम करण्यात आले, त्याप्रमाणे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे त्या काम करत आहेत.

कुणी तशा सूचना दिल्या असतील की ही नावे या समाजाची आहेत तर ते चुकीचे होणार आहे. 2004 पासून कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीत आले. त्यावेळी ओबीसींच्या अडीचशे जाती होत्या. आता सव्वाचारशे जाती झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसीमधील जाती कमी होण्याचा संबंध येत नाही. कारण मराठा समाजात अर्धे कुणबी समाजाचे आहेत, असे भुजबळ म्हणाले.

हा डेटा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नाही तर याचा उपयोग पुढे शिक्षण आणि नोकरी आरक्षणासाठी होणार आहे. त्यामुळे त्यासाठी माहितीचे योग्य परीक्षण झाले पाहिजे आणि योग्यरितीने डेटानिर्माण झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र देण्यात आल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

राज्यातील ओबीसी कार्यकर्ते, संघटना, नेते यांनी गावागावात जाऊन मतनोंदणी केली जाते तसे ओबीसी डेटा योग्य पद्धतीने गोळा केला जात आहे कि नाही हे पहावे, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथून जे लोक मुंबईत आले आहेत, त्यामध्ये कुशवाह, सैनी आहेत. हे सगळे ओबीसी आहेत. त्यांना तुम्ही घेणार नाही असे चालणार नाही. त्यांचे मतदानकार्ड आहे, रेशनकार्ड आहे.

सरकारच्या ज्या योजना आहेत त्यातील लाभ घेण्याच्या यादीत त्यांची नांवे आहेत. त्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला पाहिजे. मोठ्या शहरात ओबीसी संख्या 5 आणि 10 टक्के लिहिली जाते आहे हे जर खरे असेल तर ते धक्कादायक आहे. यामागे काम गौडबंगाल आहे हे सरकारमधील वरिष्ठांनी शोधून काढले पाहिजे, असेही भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या