Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र...तर आठ दिवसांत राज्यात मोठा निर्णय

…तर आठ दिवसांत राज्यात मोठा निर्णय

मुंबई

दिल्ली, गुजरातमध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढत आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा विचार महाआघाडी सरकार करत असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण पुणे, औरंगाबाद, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय याचा आढावा घेऊ, एकूण संख्या किती वाढतेय ते बघून आम्ही पुढच्या आठ दिवसात निर्णय घेऊ. आवश्यकता पडली तर सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावेच लागतील. पुढील आठ दिवसात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या किती पटीने वाढतेय त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत. राज्यातील संख्या वाढली तर दिल्ली गुजरातवरून येणारी रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा बंद करण्याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या