Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारयु ट्युबने चोरीचे प्रशिक्षण घेऊन कुरीयर बॉयला लुटणारे तिघांना अटक

यु ट्युबने चोरीचे प्रशिक्षण घेऊन कुरीयर बॉयला लुटणारे तिघांना अटक

नंदुरबार । प्रतिनिधी NANDURBAR

यु ट्युबव्दारे चोरीचे प्रशिक्षण घेवून ऑनलाईन पार्सल बुक करुन कुरीयर डिलीवरी बॉयला लुटणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नांदगाव येथून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 3 लाख 68 हजार 99 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. नंदुरबार येथे चेतन राजेंद्र सपकाळ (रा. शिंदगव्हाण ता.जि. नंदुरबार) यांचे डिलीवरी डॉट कॉम नावाचे कुरीयर सर्व्हिस असून दि.7 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1.30 वाजता. मनिषा रा.छोरीया रेसिडन्सी नंदुरबार मो.7887386880 या नावाच्या ग्राहकाने विवो मोबाईल एक्सप्रेस या साईटवरुन 49 हजार 980 रुपये किंमतीची एक वस्तू कॅश ऑन डिलेव्हरी मागविली. वस्तू डिलेव्हरी करण्यासाठी चेतन सपकाळ यांनी मोबाईलवर फोन केला असता त्याने आधी छोरीया रेसिडन्सी व त्यानंतर नंदुरबार शहरातील खंडेलवाल टाऊन येथे मातोश्री बंगल्याच्या समोर बोलाविले. चेतन सपकाळ हा पार्सल देण्यासाठी गेला असता तेथे थांबलेले दोन अनोळखी इसम यांनी पार्सलचे पैसे न देता त्यांच्याकडून डिलेवरीची वस्तु जबरीने हिसकावली. तसेच एक जण मोटार सायकलवरवर आला. त्याच्या मोटारसायकलीवरील तिन्ही अनोळखी आरोपी पळून गेले.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार केले. पोलिसांनी चेतन सपकाळ यांना आलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन प्राथमीक माहिती काढली. यात संशयीत आरोपी हे नांदगांव जि.नाशिक येथे गेल्याचे समजले.

संशयीत आरोपी हे नांदगाव शहरात 3 वेगवेगळ्या कंपनीचे पार्सल बुक करुन कुरीयरच्या डिलीवरी बॉयला लुटण्याच्या प्रयत्नात होते. एलसीबीच्या पथकाने स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा नांदगांव परीसरात सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील एका कर्मचार्‍याला डमी डिलीवरी बॉय बनवून संशयीत आरोपीतांना पार्सल देण्यासाठी पाठविले. पथकातील इतर कर्मचारी वेशांतर करुन सापळा रचून उभे होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फिल्टीस्टाईल झटापटी करुन सचिन मच्छींद्र राठोड, राहुल मच्छींद्र राठोड (दोन्ही रा. तांडा पिंपरी हवेली पोस्ट परधाडी नांदगांव जि.नाशिक), सागर नवनाथ चव्हाण रा.मारवडी राजदेरे ता.चाळीसगाव या तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून नंदुरबार येथील गुन्ह्यात लुटण्यात आलेला 30 हजार 999 रुपये किंमतीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतींची एक दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

असा माल केला हस्तगत

नांदगांव जि.नाशिक येथे गुन्हा करण्यासाठी आणलेली 2 लाख 50 हजार रुपये किमतीची चारचाकी सँट्रो कार, 21 हजार रुपये किमतीचे 3 मोबाईल, 16 हजार रुपये रोख अ‍ॅमेझॉन प्राईम कंपनीचे चिकट टेप, अ‍ॅमेझॉन प्राईम लिहिलेले 5 बॉक्स, रिन कंपनीचे साबण असा एकुण 3 लाख 68 हजार 99 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

आरोपीतांनी मुंबई, बदलापूर जि.ठाणे बिड, कोपरगांव जि.अहमदनगर, भुसावळ, चाळीसगांव जि, जळगांव,मनमाड जि.नाशिक येथे गुन्हे केल्याची माहिती दिलेली आहे. तसेच त्यांच्याकडुन अजून महाराष्ट्रातील इतर गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे, असे श्री.पंडीत यांनी सांगितले.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक राकेश मोरे,पोलीस शिपाई विजय ढिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

ऑनलाईन पार्सल बुक करतांना स्वत:च्या नावाने बुक करा. तसेच ऑनलाईन वस्तु बुक केलेली नसतांना कुरियर सेंटरमधून कॉल आल्यास व एखाद्या एकांत ठिकाणी पार्सल घेण्यासाठी बोलाविल्यास घेण्यासाठी जावू नका लागलीच संबंधीत पोलीस ठाण्याची संपर्क करुन घटनेची माहिती द्या.तसेच पार्सल बुक करतांना पार्सल बुक करणार्या इसमाचे नांव गांव पत्ता आधारकार्डची छायांकीत प्रत, मोबाईल नंबर आदी माहिती घ्यावी तसेच काही संशयास्पद आढळून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.

– महेंद्र पंडीत, पोलीस अधीक्षक,नंदुरबार

लॉकडाऊन काळात यु ट्युबवर शिकले चोरी

आरोपींनी पोलिसांना सांगितले की, लॉकडाऊन काळात कामधंदा नसल्याने तिघांनी चोरी करण्याचे ठरविले व चोरी कशी करावी याबाबत त्यांनी यु ट्युबवर संपूर्ण माहिती घेतली व त्याप्रमाणे स्वत: घरीच प्रात्यक्षिक करुन बघितले. त्यात ते यशस्वी झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी खरोखर अशा प्रकारची घटना करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी पहिला प्रकार मुंबई येथे केला त्यात ते तिन्ही यशस्वी झाले. त्यानंतर बदलापूर जि.ठाणे बिड, कोपरगांव जि, अहमदनगर, भुसावळ, चाळीसगांव जि.जळगांव येथे गुन्हे केल्याची माहिती दिली.

संशयीत आरोपी ऑनलाईन गुगल मॅपद्वारे एखादे शहर निवडून तेथील श्रीमंत वस्तीमधील कोणत्याही एका श्रीमंत व्यक्तीच्या नावाने महागड्या वस्तु ऑनलाईन बुक करत असत. त्यानंतर कुरियर सर्व्हिस सेंटरमधून कॉल आल्यानंतर डिलीवरी बॉयला घरी नसल्याचे सांगून किंवा इतर बहाणा करुन एखाद्या एकांत ठिकाणी बोलावून एकाने पार्सल घेतांना बोलण्यात गुंतवून ठेवायचे. एवढ्या वेळेत दोघांनी ऑनलाईन आलेले पार्सलचे सिल अतिशय हुशारीने कापून त्यातील महागडे पार्सल काढून घेवून त्यात साबण, दगड किंवा इतर वस्तु ठेवून त्याला पुन्हा त्याला संबंधीत कंपनीचे बनावट चिकटपट्टीने चिकटवून देत असत.

पार्सल घेण्यासाठी आलेला संशयीत आरोपी पैसे नसल्याचे सांगून डिलीवरी बॉयला ऑनलाईन आलेले पार्सल परत करुन देत असत. एखाद्या वेळेस डिलीवरी बॉयला संशय आल्यास त्याच्याशी झटापटी करुन तेथून पळून जाणे अशा प्रकारची नविन पध्द्त त्यांनी अवलंबली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या