Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

देवळाली कॅम्प | वार्ताहर Deolali Camp

देवळाली कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील लहवितगावच्या जनता विद्यालय मागे सुरेश तुकाराम मुठाळ हे सेवानिवृत्त सैनिक आपली आई जिजाबाई, पत्नी छाया व दोन लहान मुलांसह राहतात. सुरेश मुठाळ हे सेवानिवृत्त झाल्या नंतर सैनिक विभागातील DAC विभाग परराज्यात कार्यरत आहेत. ते सुट्टीवर येऊन गुरुवारी संध्याकाळी बंगलोर येथे आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी रवाना झाले.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घरी आई जिजाबाई, पत्नी छाया ह्या दोन मुले घरी असतात. काल संध्याकाळी आई, पत्नी मुलांसोबत इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे नातेवाईकांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. आज सकाळी ते पुन्हा घरी आल्या नंतर घराचा कडीकोंडा तुटलेला, घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते.

त्यांनी आत पाहिले असता कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याची पोत, कानातले, अंगठी व इतर सोन्याच्या वस्तू असे एकूण २५ तोळे सोने दागिने व एक लाख रोख नसल्याचे लक्षात आले. त्यांनी सदरची घटना लहवितचे पोलीस पाटील संजय गायकवाड यांना सांगितली. त्यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना फोन वरून घटनेची माहिती दिली.

माहिती समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, पोलीस पाटील संजय गायकवाड व पोलिस अधिकारी, व गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

श्वान पथकाला पाचारण केल्यानंतर त्यांनी एअरफोर्स रस्त्यावरील मार्ग दाखवला.लहवित गावात सदरची घटना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे.पोलिसांनी चोरीचा घुन्हा दाखल केला असून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या