दागिन्यांंसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

दागिन्यांंसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

सिन्नर। वार्ताहर Sinnar

दोडी ( Dodi ) येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सुळेवाडी( Sulevadi ) येथेही आज (दि.1) दुपारी 1.30 वाजता रस्त्यालगच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला मारला.

सुळेवाडी येथील शेतकरी प्रभाकर बळवंत सिरसाट यांच्या घरात कुणीही नसताना ही धाडसी चोरी झाली. देशवंडी रस्त्यालगत असणाऱ्या शिरसाट यांच्या घराची कडी कोयंडा तोडून दीड लाख रुपये रोख रक्कम व दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. शिरसाट हे कुटुंबीयांसह कांदे लागवड करण्यासाठी शेतात गेलेले होते.

शिरसाट यांचा मुलगा किरण हा कार्यक्रमासाठी बाहेर गेलेला होता. तिकडून तो घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्याने तात्काळ कुटुंबीयांना याबाबतची माहिती देत एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वर्दळीच्या ठिकाणी देशवंडी रस्त्यालगत असणाऱ्या घरात चोरी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. अलिकडे तालुक्यात दरोड्यासह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com