संभाजी स्टेडियमचे काम नव्या ठेकेदारामार्फत होणार

संभाजी स्टेडियमचे काम नव्या ठेकेदारामार्फत होणार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी आज शहरातील संभाजी स्टेडियमची (Sambhaji Stadium) पाहणी केली.

तेथील कोव्हिड सेंटरचीही (Covid Center) पाहणी करून स्टेडीयमच्या कामाची निविदा प्रक्रिया (Tender process) लवकरात लवकर पूर्ण करुन वर्क ऑर्डर देऊन काम त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाला (Construction Department) दिले.

केंद्र सरकारच्या (central government) खेलो इंडिया (khelo india) या उपक्रमाअंतर्गत संभाजी स्टेडीयमचे काम होणार आहे. त्यासाठी सहा कोटींचा निधीही (fund) मंजूर झाला आहे. शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी आयुक्तांना स्टेडियमच्या कामाबाबत माहिती दिली. कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ, उपअभियंता हेमंत पेठे, शाखा अभियंता बालाजी सूर्यकर यावेळी उपस्थित होते. खेलो इंडिया या उपक्रमाची आज व्हिसीद्वारे बैठक होती. त्यापूर्वी आयुक्तांनी संभाजी स्टेडीयमची पाहणी करुन अभियंत्यांकडून माहिती घेतली.

तो ठेकेदार काळ्या यादीत

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या प्रकल्पांतर्गत नाशिक शहरातील नवीन नाशिक विभागातील राजे संभाजी स्टेडियम येथे काम सुरू करण्यात आले होते, परंतु ठेकेदाराने काम अर्धवट केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तर आता हे काम सुरू करण्यासाठी नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत निर्णय होणार आहे. स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी केंद्र शासनाने सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातील तीन कोटी रुपये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com