महिलेला ट्रकने चिरडले

गोदावरील हॉस्पिटलजवळील घटना; दुचाकीस्वार गंभीर जखमी
महिलेला ट्रकने चिरडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

घरी परत असतांना दोन दुचाकींच्या (two-wheelers) अपघातात (accident) महिला रोडवर पडली. यावेळी मागून भरधाव येणार्‍या ट्रकने (truck) महिलेला (woman) चिरडल्याची (Crushed) दुर्देवी घटना मंगळवारी सायंकाळी गोदावरी हॉस्पिटलजवळील मुंजोबा मंदिराजवळ घडली. जुबेदा बेग अलताब हुसेन मिर्झा (वय-48, रा. समता नगर) असे मयत महिलेचे नाव असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

शहरातील समता नगरात जुबेदा बेग अलताब हुसेन मिर्झा पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. मंगळवारी सकाळी जुबेदा बेग ह्या सावदा ता. रावेर येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलगा कमिन बेग अल्ताफ बेग याच्या सोबत दुचाकीने गेल्या होत्या. सायंकाळी जुबेदा बेग ह्या मुलासह दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले.

सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोदावरील हॉस्पिटलच्या पुढे नशिराबाद रोडवर समोरून येणार्‍या दुचाकीने धडक दिली. या अपघातात जुबेदा बेग ह्या रोडवर पडल्या, तितक्यात मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महिला ट्रकखाली चिरडल्या गेल्याने ट्रकचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com