आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

सरकार उत्तरे देण्यास तयार- उपमुख्यमंत्री
आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन state legislature winter session आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून त्याचीच प्रचिती अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार Mahavikas Aghadi government हे लोकशाहीचे सरकार नसून रोखशाहीचे आहे. केवळ रोकङ्घशाही आणि रोखशाहीवर ज्यांचा विश्वास आहे आणि जे लोकशाही पायदळी तुडवत आहेत; अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही, अशा शब्दात महाविकास आघाडीवर हल्ला चढवत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण, शासकीय भरती परीक्षेचे फुटलेले पेपर, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, महिला अत्याचाराची प्रकरणे यावरून अधिवेशनात आघाडी सरकारला धारेवर धरण्याचे स्पष्ट संकेत दिले. तसेच अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या मुद्द्यांवरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

संसदेचे अधिवेशन इतका काळ चालू शकते तर महाराष्ट्रात का चालत नाही? राज्यात सर्वात कमी कालावधीसाठी अधिवेशन घेतले जात आहे. लोकशाहीला कुलुप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. पण महाराष्ट्र सरकारची अधिवेशनाची मानसिकताच नाही, असे फडणवीस म्हणाले. आमदारांचे निलंबन आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. पण आमच्या बारा आमदारांना निलंबित करून अध्यक्षांची निवडणूक घेण्याची तयारी सुरु आहे.

राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पध्दतीने झाली आहे. पण आता नियमबाह्य पध्दतीने ही निवडणूक घेण्याची तयारी सुरु आहे. या सरकाराल 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पोकळ आहे. नियम समितीचे नियम डावलून विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मंजूर केला जाणार असून त्याला आम्ही विरोध करू. राज्यात आरोग्य परीक्षा घोटाळा, टीईटी घोटाळा, म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा समोर आला. हे परीक्षेचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आम्ही त्याचा पर्दाफाश करणार आहोत.

सरकार उत्तरे देण्यास तयार: उपमुख्यमंत्री

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनीही पत्रकार परिषद घेत, विविध मुद्द्यांबाबतची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच, आगामी अधिवेशन हे सर्वांच्या मागणीनुसार नागपुरात घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी भूमिका मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुढील अधिवेशन हे नागपुरमध्ये घेण्याबाबत सरकारकडून सकारात्मक विचार होईल. सरकारच्या परंपरेप्रमाणे एक गोष्टी खरी आहे की, टीका टिप्पणी केली जात आहे अधिवेशन लहान आहे वगैरे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सध्या करोनाचें सावट आहे. हा देखील दृष्टिकोन त्याबाबतीत समोर ठेवण्यात आलेला आहे. आम्ही पुढील आठवड्यात शुक्रवारी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये मग पुढे अधिवेशन किती दिवसाचे ठेवायचे याबाबतचा निर्णय चर्चा करून घेईल.तसेच, जे काही मुद्दे उपस्थित केले त्याबाबत सरकार प्राधान्याने ज्या काही चर्चा तिथे होतील, त्या सगळ्याच चर्चेला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

या अधिवेशनात करोनाचे संकट, एसटी कर्मचार्‍यांचा संप, परीक्षा घोटाळा, वीजबिलाचा मुद्दा आणि शक्ती विधेयकाला मंजुरी असे अनेक महत्वाचे मुद्दे चर्चेला येत आहेत.गेल्या वेळेची 5 प्रलंबित विधेयके आणि नवी 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com