राज्याचे हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

राज्याचे हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुका (Mlc Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local body election) दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (January first week) अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे.

विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीतच अधिवेशनाबाबत निर्णय होईल. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

करोना सावट कायम

आगामी हिवाळी अधिवेशनावरही करोनाचे सावट कायम असल्याने अधिवेशनात सहभागी होणार्‍या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचार्‍यांपर्यत सर्वांना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक असेल. त्यामुळे अधिवेशनासाठी येणार्‍या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक राहील.

विधान भवन परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. डोस घेतला असला तरी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक राहील. त्यामुळे विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहनचालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com