वाईन उद्योगाला करात सुट मिळावी

खा गोडसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वाईन उद्योगाला करात सुट मिळावी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

द्राक्ष उत्पादकांची (Grape growers) संख्या जिल्हयात मोठ्या प्रमाणावर असल्याने नाशिकला (nashik) वाईन कॅपिटल (Wine Capital) म्हणून ओळखले जाते. नाशिकला वाईन (wine) तयार करणार्‍या अनेक कंपन्या असल्याने द्राक्ष (Grapes), जांभूळ (Purple) व इतर फळांपासून शेतकर्‍यांना (farmers) आर्थिक फायदा होत आहे.

याचे उत्पादन अजून वाढल्यास रोजगार निर्मितीस (Job creation) मदत होणार आहे. शिवाय जांभुळापासून तयार होणारी वाईन शरीरासाठी पौष्टीक (Nutritious for the body) असून निरोगी जीवनशैलीसाठी (healthy lifestyle) निश्चितच लाभदायक आहे. ही वाईन सर्वसामान्यांना कमीत कमी रकमेत मिळावी तसेच याचे उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वाईन्सवरील अबकारी करात सुट (Tax exemption) मिळून सर्वत्र किरकोळ विक्रीस परवानगी मिळावी अशी मागणी खा. गोडसे (mp hemant godse) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणावर द्राक्ष उत्पादित होतात, आदिवासी भागात जांभुळाचे पीक अमाप आहे व ते कमीत कमी खर्चामध्ये मिळणारे आहेत. दर्जेदार द्राक्षांपासून वाईन निर्मिती (Wine production) नाशिकमध्ये होत असल्याने वाईनसाठी नाशिक देशभर प्रसिध्द आहे .या उद्योगांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहतात. जिल्हयाच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात कमीतकमी खर्चात येथील शेतकर्‍यांच्या हाती जांभुळ फळाचे उत्पादन येत आहे. यामुळे जांभळापासून वाईन तयार करण्याचे संशोधन काही संस्थानी पूर्ण केले आहे .

जांभूळ वाईन गुणकारी

सदर वाईन ही आरोग्यासाठी पौष्टीक आणि निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त अशी आहे. सदर वाईन सेंद्रियरित्या तयार करण्यात येणार्‍या जांभुळापासून बनविण्यात येणार असल्याने या वाईनमध्ये कर्करोग (cancer) आणि मधुमेह (Diabetes) विरोधी गुणधर्म आहेत. सदर वाईनचा गुणधर्म तुरट असून त्वचाच्या विकारासाठी गुणकारी आहे.

जिल्हयातील आदिवासी भागात जांभुळांचे पिक अमाप असल्याने जांभुळापासून वाईन तयार करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येण्याची शक्यता आहे. वाईन उद्योगाला (Wine industry) शासनाने प्रोत्साहित केल्यास ग्रामीण भागातील द्राक्ष आणि जाभुळ उत्पादित शेतकर्‍यांचीही निश्चितच आर्थिक भरभराटी होण्यास मदत होणार आहे.

यामुळे शासनाने द्राक्ष, जांभुळ वाईन उत्पादकांना वाईनवरील अबकारी करात सूट द्यावी तसेच वाईन शॉप (Wine shop), रेस्टॉरंट (Restaurant), मॉल्स आणि सुपरमार्केट (Malls and supermarkets) आदी विविध ठिकाणच्या किरकोळ बाजारात विनापरवानगी वाईन विकांची मुभा द्यावी अशी मागणी खा हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com