वातावरण ढगाळ मात्र अवकाळी नाही

वातावरण ढगाळ मात्र अवकाळी नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शक्यते प्रमाणे शुक्रवार ३१ मार्च पर्यन्त ढगाळ वातावरण (Cloudy weather) झळकले. परंतु, शनिवार दि. १ एप्रिलपासुन पुढील ५ दिवस (५एप्रिल पर्यंत) महाराष्ट्रात

ढगाळ अथवा अवकाळी वातावरणाची (unseasonal rain) शक्यता जाणवत नाही. त्यामुळे पीक काढणीत असलेल्या शेतकऱ्यांनी (farmers) बिनधास्त राहून काढणी उरकावी, असा सल्ला पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule, a retired meteorologist) यांनी दिला आहे. जास्तीत जास्त विदर्भात शनिवारपर्यंत कदाचित अवकाळी वातावरणाची शक्यताही जाणवते, असेही त्यांनी सांगितले.

सोमवार दि.६ एप्रिल ते गुरुवार ९ एप्रिल पर्यन्तच्या ४ दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील (बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता ) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची (rain) शक्यता जाणवते. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात

वरील वातावरणाचा परिणाम शनिवारपासून ते जवळपास संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नाही. रविवार दि. २ एप्रिलपासुन दुपारच्या तापमानात काहीशी वाढ होत असली तरी येत्या १५ दिवसापर्यंत (१५ एप्रिलपर्यन्त ) महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. कदाचित संपूर्ण एप्रिल महिनाही उष्णतेच्या लाटेविना जाऊ शकतो असे वाटते.

वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोंवतालचा परिसरात आज व उद्या अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी याचीही नोंद घ्यावी, असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com