प्रभागरचना कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवणार

29 नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही; आयुक्तांची माहिती
प्रभागरचना कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आगामी महापालिका निवडणूक प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा ward plan सादर करण्याची अंतिम मुदत राज्य निवडणूक आयोगाने State Election Commission नाशिक महापालिकेला NMC दिली आहे. मध्यंतरी नाशिक महापालिकेच्या 122 सदस्य संख्येत वाढ होऊन 133 सदस्यसंख्या करण्यात आल्याने पुन्हा काम वाढले. तरी 29 नोव्हेंबर पर्यंत नाशिक महापालिकेच्या वतीने विशेष पेन ड्राईव्हमध्ये कच्चा आराखडा तयार करून रवाना करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

2022 साली होणार्‍या नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेला 30 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर तो पेन ड्राइव्हमध्ये गोपनियरीत्या सादर करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

आयोगाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील नगरसेवकसंख्या 122 वरून 133 इतकी होणार असून, तीन सदस्यीय 43 तर चार सदस्यीय एक अशाप्रकारे एकूण 44 प्रभाग अस्तित्वात येणार आहेत.

कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर प्रगणक गट, प्रभाग दर्शविणार्‍या केएमएल फाइल, तसेच सर्व प्रभाग व त्यात समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरणपत्र असलेला पेन ड्राईव्ह सील करून राज्य निवडणूक आयोगास गोपनियरीत्या सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com