तीन वर्षांपुढील मुलांसाठी सहा महिन्यांत लस

तीन वर्षांपुढील मुलांसाठी सहा महिन्यांत लस

मुंबई | Mumbai

लहान मुलांसाठी (small childrens) सिरमच्या (serum) कोव्हॅक्सिन लसीच्या (covaxin) चाचण्या सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये लहान मुलांसाठी लस येईल, असे सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला (adar poonawalla) यांनी सांगितले...

अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल, असेदेखील पूनावाला म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर अर्थात शुक्रवारी देशभरात सुमारे अडीच कोटी लसीचे डोस देण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून कौतुक होत असताना दुसरीकडे लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे 18 च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी अजूनही लसीची प्रतीक्षाच आहे.

या पार्श्वभूमीवर पूनावाला यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या हडपसरमधील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे. 18पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता 18 वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

दरम्यान, चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले, ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल. आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत.

12 वर्षांच्या खालील मुलांचादेखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुलं सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवावॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल. मात्र, जेव्हा डीसीजीआयला हे करणे योग्य वाटेल, तेव्हाच हे घडू शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com