Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग

मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मविप्रच्या (MVP) पंचवार्षिक निवडणुकीचे (election) रणशिंग वाजू लागले असून, विद्यमान पदाधिकारी व माजी पदाधिकार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मतदार याद्यांच्या (Voter lists) प्रसिध्दीपाठोपाठ राजकीय घडामोडींना गती आली आहे.

- Advertisement -

दोनही गटांकडून निवडणूक (election) तयारीला गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने सोमवारी विद्यमान सरचिटणिस नीलिमा पवार (General Secretary Neelima Pawar) व माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे (Former Speaker Adv. Nitin Thackeray) या दोनही गटांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली.

चुकीचा पायंडा पाडण्याचा ज्येष्ठ सभासदांचा प्रयत्न : पवार

मविप्रचे काम हे धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून सुरू असून, ज्येष्ठ सभासदांच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी कोणतेच बेकायदेशीर काम केले जात नसून, घटनाक्रमाची पोलिसांसह धर्मदाय आयुक्तांकडे नोंद केली जाणार असल्याचे मविप्रच्या सरचिटणिस नीलिमा पवार (MVP general secretary Neelima Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विरोधकांना मतदार याद्या (voter list) हव्या आहेत. त्यांच्याकडे पूर्वीच्या आहेत. त्यात भर पडलेल्या पुरवणी यादीचाच प्रश्न आहे. नियमाप्रमाणे याद्या बघायला मुख्यालयात ठेवल्या आहेत. प्रत्येकाने आपले नाव तपासणे व दुरुस्ती असल्यास नोंद करणे अपेक्षित आहे. जेणेकरुन निवडणुकीत दुरुस्त मतदार याद्या देता येतील. त्या तपासण्याऐवजी याद्या मागण्यावरुन घोळ घातला जात असल्याचा आरोप नीलिमा पवार यांनी केला.

विरोधकांचा हा देखावा असून, फार्मसी महाविद्यायातून निलंबित केलेल्या प्रा. अशोक पिंगळे यांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी हे नाट्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. पिंगळे हे कामाबाबत अनियमित होते. त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप होते. त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी सातत्याने माजी पदाधिकार्‍यांकडून होत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. ते न केल्याने आकसापोटी आकांडतांडव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील 12 वर्षांत संस्थेच्या अंदाज पत्रकात 475 कोटींच्या उलाढीलीची वाढ झाली. त्यामुळे संस्थेची एकूण उलाढाल 850 कोटींची झाली आहे. झाडाला फळे लागू लागल्याने दगड मारणारे तयार झाल्याची कोपरखळी त्यांनी मारली. मागील निवडणुकीत (election) तिकिटाची अपेक्षा होती, मात्र तिकीट न मिळाल्याने आता विरोधी गटातून उभे असल्याचा टोला सदस्यांचे नाव न घेता लगावला.

पूर्वीच्या गटनेत फक्त वारसांना सदस्यत्व देण्याची तरतूद होती. मात्र 8 सप्टेंबर 2010च्या घटना दुरूस्तीत 5 हजार रुपये फी घेऊन नवीन सभासद करता येणे शक्य असल्याने 2012 मध्ये 1627 नवीन सभासद केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्या तपासणीनंतर लवादाकडे सोपवल्या जातील. त्यानंतर शिक्के मारुन मतदार याद्या उपलब्ध करुन दिल्या जातील, असे नीलिमा पवार यांनी स्पष्ट केले.

विद्यमान पदाधिकार्‍यांचा मनमानी कारभार : अ‍ॅड. ठाकरे

मविप्रच्या विद्यमान पदाधिकार्‍याचा मनमानी कारभार सुरू असून, धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानंतरही याद्या उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. चुकीचा अहवाल सांदर करणे, शैक्षणिक गुणवत्तेकडे (educational quality) दुर्लक्ष, चुकीच्या पध्दतीने शाळांचे बांधकामावर खर्च करणे यासारखे गंभीर आरोप विद्यमान पदाधिकार्‍यांवर मविप्रचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे (Former MVP chairman Adv. Nitin Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केले.

मविप्रच्या पंचवार्षिक निवडणूक (election) प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या उपलब्ध करुन देण्याला पदाधिकार्‍यांद्वारे विरोध होत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी मविप्रच्या मुख्यालयात यादी मागण्यासाठी गेलो असताना यादी चोरल्याचा आरोप करण्यात आला. याद्या कोणी चोरल्या आम्हाला माहीत नसल्याचा खुलासा त्यांनी केला. यावेळी पदाधिकार्‍यांवर आरोप करताना मागील निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर करुन तालुक्यातून उमेदवारच पळवल्याचा गंभीर आरोप केला. शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष न देता बांधकाम, महागड्या जमीन खरेदीवर विशेष लक्ष दिलेले आहे. मखमलाबादला 300 मुलांसाठी 70 हजार चौरस फुटांची इमारत बांधली. एवढा मोठा खर्च का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संस्थेच्या अहवालात 40 कोटी रुपयांच्या कर्जाची गोष्ट लपवलेली आहे. आज संस्थेवर 100 कोटी रुपयांचे कर्ज असून, 50 कोटी ठेकेदारांचे देणे डोक्यावर आहे. त्यामुळे येणार्‍या पदाधिकार्‍यांवर 150 कोटींचा कर्जाचा बोझा ठेवला आहे. सद्यस्थितीत 10 ते 11 हजार सभासद आहेत. मयतांच्या नातेवाईकांनाच सभासदत्व देता येणार आहे. तर काही सभासदत्व कसे बहाल केले? असा सवालही अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांच्या समवेत जि. प. चे माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, मविप्रचे माजी संचालक डॉ. सयाजी गायकवाड, मविप्रचे माजी सेवक अशोक पिंगळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या