प्रभाग 8 : मुख्य रस्त्यावरची झाडे जीवघेणी

प्रभाग 8 : मुख्य रस्त्यावरची झाडे जीवघेणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रभाग-8 (Ward 8) हा उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व तीन झोपडपट्यांचा समावेश असलेला परिसर आहे. आसारामबापू पूल ते भोसला महाविद्यालयाचा चौक, पूढे संत कबीरनगर, गणेशनगर, सदगूरूनगर, बजरंगनगर मार्गे कॅनॉल रोडने थेट गंगापूर गावातील राजवाडा परिसरासह संपूर्ण गंगापूर गाव घेत पुढे नदीच्या किनार्‍याने आसारामबापू पूलापर्यंतचा भाग प्रभाग-8 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सुमारे 55 हजार मतदार असलेल्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात संमिश्र वर्गाच्या नागरिकांची वसाहत आहे.

यात तीन झोपडपट्यांचा समावेश असून, त्यात संतकबीरनगर, आनंदवल्लीचे बजरंगनगर, सोमेश्वर मंदिरासमोरची वसाहत तर कॅनॉल रोडलगतचे हनुमाननगर, गणेशनगर, सद्गुरूनगर या मध्यम उच्च वर्गीयांच्या वसाहती तसेच काळेनगर, शेरीन मेडोज, रामेश्वर नगर, नवश्या गणपती परिसर, बेंडकोळीनगर आदी उच्चभ्रू वसाहतीचा भाग यात आहे.

कष्टकर्‍यांसह उद्योजक व्यापारी यांची मोठी वसाहत या ठिकाणी आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यांवर मोठी वर्दळ राहते. वाहनांची पार्किंग (Parking) हा या भागातील वसाहतींचा गंभीर प्रश्न आहे.

गंगापूर गाव (Gangapur) त्यामानाने कमी समस्यांचे गाव आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या परिसरात वातव्याला आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावगाड्याचा प्रश्न राहतो. प्राथमिक सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सोमेश्वर धबधब्यालगत (Someshwar Waterfall) उभारलेल्या अद्यायावत परिचय उद्यानाच्या विकास कामाला संथ गती आहे. ठेकेदाराला ‘ब्लक लिस्ट’ करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

परिसरासाठीच्या पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याने परिसरात गस्त कमी प्रमाणात होत असल्याचे तक्रार नागरिक करीत आहेत. गंगापूर रोडवर (Gangapur Road) मोठ्या प्रमाणात वनराई बहरलेली आहे.

मात्र काही ठिकाणचे मोठमोठे वृक्ष हे रस्त्याला अडचणीचे ठरत आहेत. वृक्षप्रेमींमुळे ही झाडे काढली जात नसल्याने वाहनचालकांसाठी ते वृक्ष धोकादायक ठरत आहेत. ते तातडीने काढण्याची मागणी (Demand) होत आहे. प्रभागात चार लोकप्रतिनिधी असतानाही गंगापूर रोडवरील झाडांचा प्रश्न अधांतरीत राहिलेला आहे.

स्त्याची दुरवस्था

गॅस पाईप लाईनसाठी फोडलेल्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था गंभीर, भोसला कॉलेज गेट ते आसारामबापू पूल दरम्यानच्या रस्त्याची दैना, लगतच्या कॉलनी आणि स्लम वसाहतींना नवीन रस्त्यांची प्रतीक्षा. गणेशनगर, सदगूरूनगर, संतकबीर नगर, सोमेश्वर नगर,बजरंगनगर या भागातील रस्त्यांची दुरवस्था.

उद्यान दुरवस्था

प्रभागात उद्यान आहे, मात्र देखभाल नाही,ओस पडलेले शोभेचे उद्यान, लहान मुलांच्या खेळणीची दुरवस्था, गवताचे साम्राज्य, मोकाट जनावरांचा वावर.

आरोग्याचा प्रश्न गंभीर

प्रभागातील तीन स्लम वसाहतीत अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी अनियमित.

पथदीप

अनेक भागात नवीन पथदिपाची प्रतीक्षा.

भाजी बाजार

प्रभागातील गंगापूर गावातील अद्ययावत भाजी बाजाराचे बांधकाम संथ गतीने, भाजी विक्रेते रस्त्यावर, इतर भागातील दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, पाईप लाईनच्या भाजीबाजाराची दूरवस्ता, गंगापूररोड या वर्दळीच्या भागातील फुटपाथवर अतिक्रमण.

गंगापूररोडचा कॅनॉलरोड परिसर हा मोठ्या वर्दळीचा रस्ता झालेला आहे. या रस्ता एकेरी आहे. त्याचे चौपदरी करण करण्यात यावे.

-प्रमिला ढोले, गृहिणी

गंगापूररोड हा वर्दळीचा रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर तीन ते चार धोकादायक झाडे आहे. ती अपघातास कारणीभूत ठरत आहेत.ती तातडीने काढण्यात यावीत.

-के.जी मोरे, नागरिक

Related Stories

No stories found.