नवी दिल्ली

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यात नाशिक व नगरचा समावेश आहे. यापुर्वी महाराष्ट्रातील नऊ जिल्हे होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ३६ पैकी ८ म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे. केंद्र सरकारने देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी जारी केली आहे, जिथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे आहेत. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत तर कर्नाटकातील फक्त एका जिल्ह्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रासोबतच पंजाब, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा आठवडाभराचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २३ टक्के आहे.

राज्यातील आठ जिल्हे

नाशिक

नगर

पुणे

मुंबई

नागपूर

ठाणे

औरंगाबाद

नांदेड

देशातील इतर दोन जिल्हे

दिल्ली

बंगळूर