Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआज रंगणार टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार

आज रंगणार टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात आज शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार रंगणार असून नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांचा कसब लागणार आहे. दिवंगत शशांक शेवाळे  यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार होणार आहे…. 

- Advertisement -

या स्पर्धेचे उद्घाटन  सारूळचे सरपंच सदानंद नवले तसेच गजानन स्टोन क्रशरचे संचालक गजानन नवले याच्या हस्ते औपचारिक उदघाटन करण्यात आले. प्रख्यात दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटार कंपनी चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेली ही स्पर्धा सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे. विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे आज स्पर्धेतील सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली असून सर्व स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग दाखवण्यात आला. त्यानंतर सर्व स्पर्धकांची एक विशेष बैठक आयोजित करून त्यांना स्पर्धेविषयी सूचना करण्यात आल्या. 

आपण हळू हळू हुकूमशाहीकडे; मल्लिकार्जून खरगेंची मोदींवर सडकून टिका

आजपर्यंत भोपाळ, मुंबई, पुणे, इंदूर, बंगळुरू, डेहराडून आदी ठिकाणच्या तब्बल ३२ स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तीन महिलांचा समावेश असणार आहे. एकूण सहा गटांमध्ये विभागून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत  इलेट्रीक स्कूटर्सचाही एक गट असणार आहे.

प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिकांसह करंडक व प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. नवोदित स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रथमच सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांपैकी सर्वोत्तम वेळ नोंदवणाऱ्या स्पर्धकाला करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.  

 एफ. एम. एस. सी. आय. चे निकष पाळले जात आहेत यावर देखरेखीसाठी अधिकारी म्हणून समीर बुरकुले, सलील दातार यांची तर वाहन तपासनीस म्हणून रवींद्र वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रत्यक्ष स्पर्धेला आज शनिवारी दि. ०२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता केव्हज् काऊंटी येथून सुरुवात होईल. एकूण तीस किलोमीटर अंतरात १८ किलोमीटर अंतर हे स्पर्धात्मक असेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख कौस्तुभ मत्से, सुरज कुटे, हर्षल कडभाने, आनंद बनसोडे, अमित सूर्यवंशी, अनिश नायर हे प्रयत्न करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना, कोणकोणाचा समावेश?

- Advertisment -

ताज्या बातम्या