Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये रंगला टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर स्पर्धेचा थरार

नाशिकमध्ये रंगला टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर स्पर्धेचा थरार

नाशिक | प्रतिनिधी

नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात झालेल्या टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅली मध्ये मुंबईच्या वेंकटेश शेट्टी याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले . तर नाशिकच्या देवेंद्र गुंजाळ याने फर्स्ट टायमरचे पारितोषिक पटकावले .

- Advertisement -

या स्पर्धेत पाऊस नसल्याने नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांची चांगलीच कसब बघायला मिळाली . दिवंगत शशांक शेवाळे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ( एफ एम एस सी आय ) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार झाली .

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉक्टर अक्षय पाटील, वासन टोयोटाचे बेदी , केव्हज काऊंटीचे राजवर्धन देवरे ,दिलीप शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले . विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख कौस्तुभ मत्से ,सुरज कुटे , हर्षल कडभाने, आनंद बनसोडे, अमित सूर्यवंशी, अनिश नायर ,शमीम खान यांच्या बरोबर इतर सहकारी काम बघितले .

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

क्लास एस

प्रथम रोहन ठाकूर मुंबई , द्वितीय निलेश ठाकरे नाशिक, तृतीय अन्वर अन्नू भोपाळ .

क्लास एस १

प्रथम मोहम्मद अनिस भोपाळ ,द्वितीय हेमंत मोरे पुणे ,तृतीय हितेन ठक्कर नाशिक .

क्लास एस २

प्रथम व्यंकटेश शेट्टी मुंबई ,द्वितीय किशोर जाधव पुणे ,तृतीय मुजफ्फर अली भोपाळ .

क्लास एस ३

प्रथम दर्शन चौरे नासिक , द्वितीय झिशांत सय्यद मुंबई ,तृतीय तेजस कदम मुंबई .

क्लास एस ४

प्रथम पूजा खरे नासिक द्वितीय गीता पाटील नाशिक तृतीय कीर्ती तांडेले नाशिक

क्लासएस ५

प्रथम लोकेश भोसले पुणे , द्वितीय अमरेंद्र साठे पुणे , तृतीय हितेश घाटके पुणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या