
मुंबई । वृत्तसंस्था Mumbai
आयपीएल (IPL. )क्रिकेटच्या ( Cricket ) 15 व्या हंगामाचा थरार आज दि.26 मार्चपासून सुरु होणार आहे. या हंगामाच्या पहिल्याच दिवशी गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings Vs Kolkata Knight Riders ) हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. हा सामना अगदी उद्यावर येऊ ठेपल्यामुळे दोन्ही संघांनी मैदानावर बहारदार खेळ करण्यासाठी कंबर कसली आहे.
या दोन्ही संघातील एक सारखी गोष्ट म्हणजे दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर या दोघांचाही कस लागणार आहे. पण हा सामना कोणता संघ जिंकून गुणांचे खाते उघडणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
दोन्ही संघांवर नजर फिरवली तर केकेआरपेक्षा नक्कीच चेन्नईचा संघ हा बलवान दिसत आहे. कारण त्यांच्याकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंची फळी आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकण्यासाठी केकेआरपेक्षा चेन्नईचेच पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे.
पण ट्वेन्टी-20 सामन्यात एका चेंडूत खेळ बदलू शकतो, त्यामुळे केकेआरच्या संघालाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे हा पहिला सामना चांगलाच रंजकदार होऊ शकतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सीएसकेसंघ- ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेंद्रसिंग धोनी, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, प्रशांत सोलंकी.
केकेआर संघ - व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितिश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरीन, टीम साऊदी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरूण चक्रवर्ती.