पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले

दोघांचे पाय निकामी ; दोन जखमी
पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले

पाचोरा Pachora प्रतिनिधी

दि.१२ च्या पहाटे साडेपाच - सहा च्या सुमारास भडगावकडुन बुलढाण्याच्या दिशेने भरधाव वेगात (Going fast) जाणाऱ्या  पिकअप वाहन (Pickup vehicle) चालकाने (driver) शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्रीदत्त मंदिरासमोर ओट्यावर  बसलेल्या चौघांना चिरडले (Crushed all four). या धडकेत चौघांपैकी दोघांचे पाय गुडघ्यापासुन निकामी झाले असुन दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

पहाटे ५ वाजेच्या सुमारास भडगावच्या दिशेकडून बुलढाण्याकडे एम. एच. बी. एम. ७९४३ ही पिकअप भरधाव वेगाने जात  होती. ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने शहरातील महाराणा प्रताप चौकात श्री. दत्त मंदिरासमोरच्या  ओट्यावर बसलेल्या  वसंत भाईदास पाटील (वय – ४२) रा. सुरत, विनोद पाटील (५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (वय – २७, रा. पाचोरा ) व कुंदन परदेशी (वय – १७ रा. पुनगाव ता. पाचोरा) या चौघांना उडविले.

पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा
पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस... करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात वंसत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय जागेवरच तुटून  पडले.  तर, अन्य दोघे जखमी झाले आहेत. सकाळची वेळ असल्याने कॉलेज ग्राउंडवर फिरणाऱयांच्या मदतीने  तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  पिकअपच्या  पिकअप चालक पवन रतनसिंग गोटी व क्लिनर सावन भरतसिंग गोटी दोन्ही राहणार वसई. यांनापोलिसांनी संतप्त जमावातुन लगेच ताब्यात घेतले. पोलिसातपंचनाम्या नंतर अपघाताची तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

लग्नासाठी आले ; अन पाय गमावले

जखमीतील वसंत पाटील हे घरातील कर्ते पुरुष असुन ते आज सकाळी खाजगी लक्झरी ने एका लग्नासाठी आले होते. पहाटे चहा घेऊन नातेवाईकांची वाट पाहात ते मंदिरा समोरच्या ओट्यावर इतरां सोबत बसले असतांना अचानक झालेल्या अपघातात त्यांना दोन्ही पाय गमविण्याची दुर्दैवी वेळ आली.

हायवे बनला मृत्यूचा सापाळा

 पाचोरा रेल्वे पूल ते अंतुर्ली फाट्या पर्यंत या रोवर लहान -मोठया जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे. हा रॉड एक प्रकारे मृत्यूचा साफळा बनत चालला आहे.या पूर्वी देखील या रोडवर दिवसा आणि रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ज्ञात -अज्ञात वाहनांच्या धडकेत तरुण , वयस्कर ,आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचे बळी गेले आहे.

पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...

स्पीड ब्रेकरच्या मागणी कडे दुर्लक्ष

रेल्वे पूल ते अंतुर्ली फाट्या पर्यंत च्या रोडवर हायवेला कॉलनी भागाला जोडणारे रस्ते, शाळा, महाविद्यालय आहेत .तसेच सकाळी जेष्ठ नागरिक महिला-पुरुष  मोठया संख्येत फिरण्यासाठी बाहेर पडतात.  या रस्त्यावर वाहनांना वेग मर्यादा नसल्याने दिवसेंदिवस जीवघेणे अपघात घडूत आहे.  त्यामुळे या रस्त्यावर वेगवान दुचाकी-चारचाकी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर करावेत अशी मागणी वारंवार होत आहे. परंतु स्पीड ब्रेकरच्या मागणी कडे दुर्लक्ष होत आहे ,आणि दररोज अपघात होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com