Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारतापमानाचा पारा 45 पर्यंत जाणार

तापमानाचा पारा 45 पर्यंत जाणार

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) प्राप्त माहितीनुसार, सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील (north and west) भागातून उष्ण आणि कोरडे वारे (Hot and dry winds blow) वाहत असून तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवस तापमान जास्त (High temperature) राहील अशी माहिती कृषि विज्ञान केंद्राचे (Krishi Vigyan Kendra) कृषि हवामान शास्त्रज्ञ (Agricultural Meteorologist) सचिन फड यांनी दिली. पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होऊन पारा 42 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट मॅसेज तयार करुन ३९ हजारात फसवणूक

तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूनी उन्हाळी भुईमुग, बाजरी, मुग, तीळ आदी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी.

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळVISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा

जेणेकरून पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा ज्यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपई सारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…पाडळसे येथील तरुणीवर चाकू हल्ला : जळगावात उपचार सुरु

दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी 12 ते 4 या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेऊन मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे अशी माहिती डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलीत कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषि हवामान केंद्राने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या