Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामध्य महाराष्ट्रात तापमान घसरणार

मध्य महाराष्ट्रात तापमान घसरणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशासह सध्या स्वच्छ वातावरण जाणवत आहे. मात्र, महाराष्ट्रातील खान्देश (नंदुरबार, धुळे जळगांव) व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित 2 ते 3 डिग्रीने तेथील तापमानात घट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पुढील 5 दिवसात 2-3 डिग्रीने दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊ शकते. दिवसाचे कमाल उच्च तापमान, आर्द्रतायुक्त व गरम हवेमुळे मुंबईसह कोकणात उष्णतेमुळे जाणवत असलेली अस्वस्थता कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस म्हणजे मंगळवार 16 मेपर्यंत उष्णता जाणवू शकते, असे अंदाजात म्हटले आहे.

ताशी 160 ते 170 कि.मी. चक्रकार वादळी वारा वेगाचे अति तीव्रस्वरूप धारण केलेले चक्रीवादळ रविवारी (दि.14) दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान बांगलादेश व ब्रह्मदेश सीमेवरील मकोक्सबझारफ (बांगलादेश) व मसीट्टवेफ जवळील कॅऊकपायऊ (ब्रह्मदेश) शहरा दरम्यानच्या किनारपट्टीवर आदळले. ते सरळ ब्रमह्मदेशाच्या भूभागावरून घुसून मध्यरात्री किंवा सोमवारी (15 मे) सकाळपर्यंत विरळ होण्याची शक्यता आहे.

पूर्व व पूर्वोत्तर राज्यांत अतिजोरदार वादळी वारा व जोरदार पावसाव्यतिरिक्त भारताला चक्रीवादळाचा विशेष धोका नसण्याचे संकेत जाणवत होते. बांगला व ब्रह्मदेशाला मात्र विशेष धोका पोहोचू शकतो, असे वाटते.बद्री-केदार पर्यटकासाठी तेथील वातावरण सध्या केवळ काहीसे ढगाळलेले राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते,असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या