Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासंशयित करोना रुग्णाने थेट गाठले महापालिका मुख्यालय

संशयित करोना रुग्णाने थेट गाठले महापालिका मुख्यालय

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील करोना संसर्ग वाढत असल्याने खाजगी व महापालिका रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडत असतांनाच आज सायंकाळी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात ऑक्सीजन सिलेंडरसह असे दोन संशयित रुग्ण दाखल झाल्याने प्रशासनाचा मोठा गोंधळ उडाला. अखेर मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या आदेशानुसार या रुग्णांना बिटको रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

महापालिका क्षेत्रातील करोना बाधीत झालेल्या रुग्णांची संख्या 15 हजाराच्यावर गेल्यामुळे आता आता मनपा व खाजगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे घरीच उपचार घेत असले तरी गंभीर रुग्णांची मात्र मोठी हेळसांड होत असल्याचे सांगितले जात आहे.

काही रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी असतांना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारात कामटवाडे डीजीपीनगर भागातील बाबासाहेब कोळे (वय 38) हे सरकारी व मनपा रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसल्याने कुटुंबासह राजीव गांधी भवनात आले. त्यांच्यासोबत ऑक्सीजन सिलेंडर देखील होते. त्याची गेल्या तीन दिवसापासुन प्रकृती खालावल्यानंतर आजच त्यांची करोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. मात्र ऑक्सीजन पातळी खालवल्यानंतर ते जिल्हा रुग्णालय, डॉ. जाकीर हुसेन व बिटको रुग्णालयात गेले, मात्र त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे ते राजीव गांधी भवनात आले.

यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर व विलास शिंदे यांची रुग्णांची माहिती घेतली. नंतर याबाबत आयुक्तांची चर्चा करण्यात आली. नंतर वैद्यकिय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी या रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भाती माहिती दिली. नंतर काही वेळेनंतर अ‍ॅम्बुलन्स या रुग्णांना घेण्यासाठी आली.

हा गोंधळ सुरु असतांनाच अजिंक्य संकपाळ (वय 28) रा डीजीपीनगर ठाकरे शाळेजवळ हा संशयित रुग्ण राजीव गांधी भवनात खाजगी वाहनाने दाखल झाला. त्याने देखील खाजगी रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसल्याची तक्रार याठिकाणी केली. यानंतर पुन्हा मनपा आरोग्य अधिकार्‍यांना यासंदर्भातील माहिती सुरक्षा रक्षकांकडुन देण्यात आल्यानंतर त्यांनाही नाशिकरोड बिटको रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. अशाप्रकारे आज सायंकाळी महापालिका मुख्यालयापर्यत रुग्णांनी येत आपली गार्‍हाणी मांडत शहरातील रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दाखवून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या