विद्यार्थ्यांनी तयार केली बियाण्यांची बँक

विद्यार्थ्यांनी तयार केली बियाण्यांची बँक

नाशिक | अनिरुद्ध जोशी

सलग दुसर्‍या वर्षी आदिवासी भागातील आश्रम शाळा (Ashram schools in tribal areas) बंद असल्याने विद्यार्थ्यांसमोर शिक्षण घेण्याचे आव्हान (The challenge of learning in front of students) उभे राहिले आहे. आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवत आहेत...

शिकवण्यासोबतच शाळाबाह्य उपक्रमांचे (co curricular activities) धडे देत आहेत. असेच काही उपक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथील विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेत (Vitthalrao Patwardhan Utkarsh Ashram School) कोरोनाकाळात (Corona) राबविले गेले.

आश्रमशाळेने बीज संकलन, बीज प्रक्रिया, रोपवाटिका, पाणी ऑडिट, घनकचरा ऑडिट, जीवामृत तयार करणे, विद्युत मीटर वाचन, पक्षी निरिक्षण, रानभाजी अभ्यास असे नवनवीन उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांना उभारी मिळत आहे.

विद्यार्थ्यांना घरगुती पातळीवर काही उपक्रम देऊन त्यांना आनंदमय शिक्षण घेता यावे व त्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र शासन पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रम देण्यात आले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात असणार्‍या झाडांच्या बिया संकलन केल्या. त्यावर बीज प्रक्रिया करून रोपवाटिका तयार केली. यासाठी उपक्रमाचे प्रमुख प्रा. विजय वाघेरे (Vijay Waghere) यांचे मार्गदर्शन लाभले.

11 वीचा विद्यार्थी कृष्णा सुंबाटे (Krishna Sumbate) याने शिक्षिका उज्वला पवार (Ujwala Pawar) यांच्या मार्गदर्शनातून अ‍ॅटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायझरचे (Automatic hand sanitizer) मशीन तयार केले. सध्या याच मशीनचा वापर शाळेत करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना विद्युत मीटरची सविस्तर माहिती देऊन मीटर कसे रीड करायचे याबाबत शिकविण्यात आले. जंगलाच्या परिसरात जाऊन पक्षी निरीक्षण शिकवले. विविध रानभाज्यांची माहिती देण्यात आली. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत विद्यार्थीनींनी घरगुती कापडी मास्क तयार केले.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहेच परंतु शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळाबाह्य उपक्रम राबविणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासले तर नक्कीच त्यांचे भविष्य उज्ज्वल राहील यात काही शंका नाही. त्यामुळे प्रत्येक शाळांमध्ये अशा प्रकारचे शाळाबाह्य उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

कोविडकाळात शाळेतील शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. विविध शाळाबाह्य उपक्रमांचे आयोजन आश्रमशाळेमार्फत करण्यात आले होते. पालकांनी या उपक्रमांचे कौतुक केले असून हे उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहेत.

- नितीन पवार, माध्यमिक मुख्याध्यापक, विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा.

शाळाबाह्य उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनांची ओळख व्हावी हा यामागील उद्देश होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची गोडी निर्माण झाली तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे संबंध यामुळे अधिक दृढ झाले आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल.

- प्रा. विजय वाघेरे, पर्यावरण सेवा समन्वयक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com