Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याप्रकल्प उशाला, कोरड घशाला!

प्रकल्प उशाला, कोरड घशाला!

खोकरविहीर । देवीदास कामडी

दुष्काळी गावांना पिण्याचे पाणी मुबलक मिळावे व ती गावे पाणीदार व्हावी, यासाठी कोटयावधींचा निधी वापरुन मांजरपाडा प्रकल्प ( Manjarpada Project ) उभारण्यात आला. त्याला यशही मिळाले. दुष्काळी गावांना पाण्याचे नियोजन करण्यात यश आले असले तरीही स्थानिकांना मात्र त्या पाण्याचा आजही फायदा होत नाही.

- Advertisement -

लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मांजरपाडा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु स्थानिक आसपासच्या खेड्यापाड्यांना शेतीला, पिण्यासाठी प्राध्यान्या देण्याची तजवीज न करता इतर तालुक्यातील गावांना शेतीचे नियोजन केले हे तितकंच दुर्दैव मानावे लागेल. मांजरपाडा प्रकल्पातुन पिण्यासाठी जलवाहिनीव्दारे स्थानिक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय, शेतीसाठी सोय उपलब्ध होऊ शकत होती. हे गावे उन्हाळ्यात पाणी टंचाई मुळे इतरत्र वणवण भटकंती करीत असताना सुद्धा महिलांकडे, शेतकरी यांच्याकडे लक्ष गेलेले दिसत नाही. मांजरपाडा प्रकल्प नदीच्या खाली केटीसाठी जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी छोटे छोटे केटी बंधारे उपलब्ध करुन दिले पाहिजे होते याचा उपयोग जंगली पशु, पक्षी प्राण्यांना होऊन पाळीव प्राणी यांना सुद्धा होऊ शकला असता याकडे दुर्लक्ष केलेले दिसते.

मांजरपाडा येथे केम पर्वत असल्याने दिवाळी निमित्त मोठया प्रमाणात यात्रेस महाराष्ट्र, गुजरात राज्यातून भाविक, पर्यटक येत असतात या प्रकल्पात बोटिंग क्लब सारख्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. यामुळे स्थानिक गावांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देणे आवश्यक होते. परंतु पावसाळ्याचे चार महिने सोडले तर स्थानिक गावातील ग्रामस्थ हे रोजगारासाठी दिंडोरी, निफाड, चांदवड, वणी, पिंपळगाव इत्यादी भागात कामावर जात असतात. ज्या भागात मांजरपाडा प्रकल्प उभा केला गेला त्या भागातील ग्रामस्थ इतरत्र काम करीत आहेत आणि ज्या भागात मांजरपाड्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले त्या भागाला बारमाही शेती सुरु झाली.

हा सारासार मांजरपाडा प्रकल्प उभा केला त्या स्थानिक गावावर, शेतकर्‍यावर अन्यायच केल्या सारखं सरकारच धोरण दिसत याबाबतीत अनुकरण करणे गरजेचे आहे. केम मंदिर डोंगरावर वसलेलं असुन या ठिकाणी वनविभागाचे क्षेत्र आहे हे पर्यटन म्हणून विकसित झाले असते तर या अनेक स्थानिक गावांना हाताला रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. डोंगरावर पडणारे धबधबे आहेत. जंगली वनस्पती, भुयार, विविध जातींचे पक्षी, वृक्ष उपलब्ध आहेत. पक्षी प्रेमी, जंगल सफारी, पर्यटक यांना उपयोग होऊ शकत होता. या ठिकाणी निसर्गाचे भ्रमण करण्यासाठी पाऊल वाटा प्रयटन निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असताना सर्व निधी मांजरपाडा प्रकल्प हा पूर्वी कडील भाग विकसित करण्यावर भर देण्यासाठी केलेला दिसत आहे. यात स्थानिक गावांचा विकास होईल याकडे साफ दुर्लक्षित आहेत.

पंगारबारी दरवर्षी पाणी टंचाई समस्या उद्भभते. महिलांना दूरवरुन पाणी आणावे लागत आहे. विहीर, जलवाहिनी, पाण्याची टाकी बांधकाम करुन गावात पाणी आणल्यास पाणी समस्या कायमस्वरूपी दूर होऊन गाव टंचाई मुक्त होईल, यासाठी शासनाने लवकरच डांगराळे ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करुन द्यावा.

अरुण मोंढे, सदस्य ग्रामपंचायत डांगराळे

प्रकल्पाविषयी नाराजी

या प्रकल्पामुळे येवला, औरंगाबाद, व मराठवाड्यामध्ये अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा झालेला आहे. परंतु स्थानिक गावांसाठी नावापुरतेच मांजरपाडा प्रकल्प दिसतो याचा फायदा दुसर्‍या भागासाठी केला जातो आणि स्थानिक गाव कोरडवाहू शेती पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जातात. मांजरपाडा प्रकल्पाचा गाजावाजा अवघ्या राज्यात झाला परंतू स्थानिकांच्या गरजा व भविष्याचा मात्र या प्रकल्पात विचारच केला नसल्याने या प्रकल्पाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.

मांजरपाडा प्रकल्पामध्ये करोडो रुपये खर्च करूनही गोगुळ, पंगारबारी, मेनमाळ, सारखे गाव पिण्याच्या पाण्यापासुन वंचित आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा पाणी प्रथमत: स्थानिक ग्रामस्थांना , शेतकर्‍यांना उपयोगी कसे ठरेल याकडे मायबाप लक्ष द्यावे.

चुडामन पीठे, ग्रामस्थ, पंगारबारी

- Advertisment -

ताज्या बातम्या