Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रलवकरच पुणे-नाशिक इलेक्ट्रीक बस धावणार

लवकरच पुणे-नाशिक इलेक्ट्रीक बस धावणार

पुणे

देशात इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती वाढत असून सरकारकडूनही त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर आता राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची (Electric Vehicle Policy) अंमलबजावणी केली जात आहे. एसटी महामंडळ (st) त्यासाठी सज्ज झाले आहे. पुण्याहून राज्यातील सहा शहरात इलेक्ट्रक बस (Electric Bus) धावणार असून त्यात नाशिकचा (nashik)समावेश आहे. एसटी प्रशासन 100 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लवकरच यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळ 100 बस भाडेतत्वार घेऊन चालवणार आहे. त्यामधल्या 30 बसेस पुणे विभागाच्या वाट्याला येणार आहेत. या बसेसची आसनक्षमता 43 असणार आहे. पुणे-नाशिक, पुणे-औरंगाबाद, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-महाबळेश्वर या शहरांसाठी पुण्याहून इलेक्ट्रिक बसेस धावतील. पुढच्या सहा महिन्यात या बसेस धावतील.

सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन

एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करून देण्याची जबाबदारी महामंडळाची असेल. त्यासाठी राज्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. यामध्ये पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूरचा समावेश आहे. पुण्यात तब्बल 3 हजार किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 20 चार्जिंग पॉईंट्स असतील. त्यासाठीचा अंदाजे खर्च सुमारे 2 कोटी रुपयांच्या घरात आहे.

चार्ज झाल्यावर 300 किमी धावणार बस

एक बस चार्ज होण्यासाठी 2 तासांचा वेळ लागेल. एकदा चार्ज झाल्यानंतर बस साधारण 300 किमी धावेल.शहरं आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या दृष्टीने चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांना करात सवलत दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या