विनाअनुदानित शाळांबाबत राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

विनाअनुदानित शाळांबाबत राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील 60 हजार शिक्षकांना याचा फायदा होईल, ही माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली.

केसरकर यांनी सांगितले की, 20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. पात्रता पूर्ण न करू शकलेल्या संस्थांना वगळून सर्वच्या सर्व शाळांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

जवळपास 1 हजार 160 कोटी रुपयांचे पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. ज्यांनी मागण्याही केलेल्या नाहीत त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com