राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकला

आर.ओ तात्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांची सरकारवर टीका
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकला

पाचोरा Pachora प्रतिनीधी

केंद्र सरकारने (Central Govt) विनाटॅक्स ५५ हजार गाठी आयात करून शेतकर्‍याच्या (farmer) कापसाचे मोठे नुकसान केले.शरद पवार हे केंद्रात कृषीमंञी असतांना व महाविकास आघाडीचे राज्यात (Maha Vikas Aghadi Govt) सरकार असतांना या दोन्ही वेळा शेतकर्‍यांच्या हिताचे खर्‍याअर्थाने निर्णय घेण्यात आले.आता माञ केंद्र व राज्य सरकारने (Central and State Govt)शेतकर्‍यांच्या पदरात धोंडा टाकला आहे. असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केला

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकला
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये

येथिल भडगाव रोडवरिल निर्मल सिडस् येथे सायंकाळी ५:३० च्या दरम्यान शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर याठिकाणी स्व.आर.ओ.तात्या पाटिल यांचा स्मृती अभिवादन सौहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलत होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकला
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी बोलतांना सांगितले की, आर.ओ.तात्या यांची सुकन्या वैशाली सुर्यवंशी हीला मी अगदी लहानपणी पाहिले असतांना त्याचवेळी तिच्यातिल आर.ओ.तात्यांप्रमाणेच गुण हेरले होते.वैशाली ही आर.ओ.पाटलांच्या पावलावर पाउल ठेउन चालणारी एकनिष्ठ जिद्दी व चिकाटी असलेली कन्या असल्याने आर.ओ.तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनीच तिला आर्शिवाद द्यावे ही या क्षणाला मी अपेक्षा व्यक्त करित आहे.

राजकारणात अनेकवेळा शेतकरी हिताचे निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतले जातात.शेतकर्‍यांचा वापर अनैक लोक केवळ खुर्ची आणी सत्तेसाठी करतात.माञ आर.ओ.तात्या हे शेतकरी जगला तरच देश वाचेल या दृष्टीकोणातुन सतत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर झटत असत.केवळ माझा शेतकरी व त्याच्या शेतीच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे.

शासनाने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या वाणाची निर्मीती करण्याचे ते स्वप्न पाहायचे.त्यांनी सतत शेती आणी शेतकर्‍यांचा ध्यास घेतल्याने शेतकर्‍यांचा खरा मिञ म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली होती.त्यामुळेच त्यांनी देशात पहिल्या व आशिया खंडात दुसर्‍या जैव तंञज्ञान प्रयोगशाळा काढुन निर्मल सिडस् चे नाव जागतिक पातळिवर नेउन पोहचविले आहे.मला आज या लॅबचे उध्दघाटन करतांना जितका आनंद होत आहे.तितकाच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना माझे अंतरकणाला दुःख होत आहे.असे अतिशय भाउक शब्दात माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी निर्मल सिडस् चे संचालक डाॅ.सुरूश पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.तर मुख्य व्यवस्थापक सुरेश पाटिल यांनी आपल्या प्रास्ताविकातुन निर्मल सिडस् चा लेखाजोखा सादर केला.

यावेळी स्व.आर.ओ.तात्या पाटिल जैव तंञज्ञान प्रयोगशाळेचे उद्धघाटन स्व.तात्यांच्या ११ फुटी पुतळ्याचे अनावरण, निर्मल स्कुल येथिल पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले.

या कार्यक्रमास खा.संजय राउत,खा.अरविंद सावंत,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे,जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत,जिल्हा प्रमुख डाॅ.हर्षल माने,अमळनेर येथिल आमदार अनिल पाटिल,निर्मल सिडस् चे जेष्ठ संचालक डाॅ.सुरेश पाटील डाॅ.जे.सी.राजपुत,दिलिपराव देशमुख,वैशाली सुर्यवंशी स्व.आर.ओ.तात्या यांच्या पत्नी कमलताई पाटील ,मुख्य व्यवस्थापक सुरेश पाटील,प्रमोद दळवी,रवी चौरपगार,माजी आमदार दिलिप वाघ, सह पाचोरा भडगाव तालुक्यातिल कृषितज्ञ,आदर्श शेतकरी,डाॅक्टर,वकिल,शिक्षक,मेडिकल असोशिएशनचे पदाधिकारी,कृषी सेवा केंद्रांचे संचालक,निर्मल सिडस् चे डिलर,व्यापारी,राजकिय,सामाजिक व विविध क्षेञातिल मान्यवर व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com