राज्य शासनाने 'या' नद्या स्वच्छ करण्याचा घेतला निर्णय

राज्य शासनाने 'या' नद्या स्वच्छ करण्याचा घेतला निर्णय

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने (Maharashtra State Govt) महाराष्ट्रातील 75 नद्या (rivers) स्वच्छ (clean) करण्याचा निर्णय घेतला आहे. 'चला जाणूया नदीला' हा उपक्रम त्यानंतर सुरू केला आहे.

त्या अंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी जतिन रहेमान (Assistant Collector Jatin Rahman) यांच्या मार्गदर्शनाखाली कपिला (Kapila), नंदिनी (Nandini) व वरुणा (Varuna) नद्यांच्या समस्या आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी तिच्या मार्गातील अडथळे व दोन्ही नद्यांचे पात्र व जागा अधोरेखित करण्यासाठी पाहणी करण्यात आली. वाढते नदी प्रदूषण (River pollution) आणि अतिक्रमण (Encroachment) याकडे महानगरपालिका (Municipal Corporation), जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन

त्यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास या उपनद्या येत्या इतिहास जमा होतील, अशी भीती 'चला जाणू या नदीला' उपक्रमांतर्गत आयोजित पाहणी मध्ये व्यक्त करण्यात आली. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून तोच अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जतिन रहमान, सहाय्यक व संरक्षक अधिकारी गणेश झुले, नायब तहसीलदार अनिल धडे, मनोज क्षत्रिय, पंचवटी आरोग्य अधिकारी संजय दराडे, कपिला नदी समन्वयक राज्य सदस्य डॉ. योगेश बर्वे वरुणा नदी समन्वयक राज्य सदस्य सुनील परदेशी,दीपक बैरागी, प्रकाश बर्वे, जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त मधुकर जेजुरकर आदी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com