आकाशात चमकणार डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा तारा

‘स्टार नेमिंग डॉट कॉम’कडे राजू शिंदेंची नोंदणी; आजपासून मोबाईलवर दिसणार तारा
आकाशात चमकणार डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा तारा

संजयसिंग चव्हाण

भुसावळ Bhusawal

आज 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती (Jayanti) भारतभर मोठ्या उत्साहात साजरी (Celebration) केली जात असताना केवळ पृथ्वीवरच नव्हे तर, नभोमंडळातदेखील (constellation) डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा (Named after Dr. Babasaheb Ambedkar) तारा (star)झळकणार आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचा देह अनंतात विलीन झाला होता तेव्हा ‘जब तक सुरज चाँद रहेगा बाबा आपका नाम रहेगा!’ अशी घोषणा दिली गेली होती. ही घोषणा सत्यात उतरली आहे. डॉ.बाबासाहेबांच्या नावे एका तार्‍याची नोंद झाली असून हा तारा पाहता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील महानगर पालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते राजू शिंदे यांनी अमेरिकेमधील ‘स्टार नेमिंग डॉट कॉम’कडे ही नोंदणी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीदिनी या तार्‍याचे लॉचिंग होईल. अँड्रॉइड व अ‍ॅपल युजर्स हा तारा अ‍ॅप डाऊनलोड करुन पाहू शकतात. आकाशातील तार्‍याची नोंदणी (रजिस्ट्री) करणारी ‘इंटरनेशनल स्टार अ‍ॅण्ड स्पेस रजिस्ट्री’ नावाची ही संस्था अमेरिकेत आहे.

या संस्थेमार्फत अवकाशातील तार्‍यांना नाव दिले जाते. फ्रान्स या देशातही अशी संस्था आहे. शंभर डॉलर म्हणजे भारतीय चलनात नऊ हजार रुपये भरुन एका तार्‍याची रजिस्ट्री केली जाते. या संस्थेकडे डॉ.बाबासाहेबांच्या नावे नोंद व्हावी म्हणून 9 फेब्रुवारी 2023 रोजी श्री.शिंदे यांनी अर्ज केला होता.

एक महिन्याने श्री.शिंदे यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. https://space-registry.org या स्पेस रजिस्ट्री अ‍ॅपच्या संकेतस्थळावरुन हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक व टॅबवर पाहता येऊ शकेल. त्याशिवाय अँड्रॉइड व आयफोनवरुनही हा तारा पाहता येणार आहे.

हा तारा असा पाहता येईल

द इनोव्होटिव्ह युनिव्हर्स स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन अ‍ॅप फॉर अँड्रॉइड अँड आयओएसवरुनही हा तारा पाहता येईल. प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अ‍ॅप डाऊनलोड करुन घेता येईल. अ‍ॅपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचाCX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव दिसेल-विकिपीडियावरील माहितीनुसार उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या अंदाजे 10 हजार तार्‍यांपैकी फक्त 336 तार्‍यांची रजिस्ट्री करुन विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंत व मान्यवरांची नावे आहेत. त्यात आता डॉ.बाबासाहेबांच्या नावानेही एक तारा झळकणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com