मातीला विश्रांती हवी!

मातीला विश्रांती हवी!

दै.'देशदूत' ( Daily Deshdoot ) आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha )यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माती वाचवा’ ( Save Soil Campaign )या विषयावर श्री. सद्गुरु ( Shri Sadguru )यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 11 जून. वेळ सायंकाळी 5 वाजता. ठिकाण केटीएचएम महाविद्यालय मैदान. त्यानिमित्ताने साधलेला संवाद.

निफाड। प्रतिनिधी Niphad

विविध कारणांमुळे जमिनीचा पोत घसरत आहे. साहजिकच उत्पादन खर्च वाढत असला तरी उत्पादनात मात्र मोठी घट होऊ लागली आहे. शेतीसाठी माती किती महत्वाची आहे याचा प्रत्यय वारंवार येत आहे.

माती वाचवली पाहिजे!

माती चांगली असेल तर पीक चांगले येईल. परंतु अलिकडे माती कमी होत चालली आहे. माती असेल तरच बियाणे पेरता येईल व पेरलेले बियाणे उगवू शकेल. त्यामुळे प्रथम आपण माती वाचवली पाहिजे. आपल्या मातीत जे घटक आहेत ते कमी झाले तर त्याचा पीक वाढीवर परिणाम होत असतो. माती परिक्षणानंतर खतांची मात्रा, तिची मशागत कशी करावी त्याचे नियोजन करता येते. त्यामुळे प्रत्येकाने माती परीक्षण करायलाच हवे.

डॉ. कैलास पाटील

जमीनीला विश्रांती हवी!

मातीची सुपिकता जपण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय खते दिली गेली पाहिजे. तसेच सध्या जमिनीत वेगवेगळी पीके घेण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीला विश्रांतीची गरज आहे. त्यासाठी शक्यतो जमिनीत एकच पीक वारंवार घेवू नये.

डॉ. भाऊसाहेब रायते

आलटून पालटून पीके घ्यावीत!

मातीची कस म्हणजे सुपिकता जपण्यासाठी आलटून पालटून पीके घेतली पाहिजे. कीटकनाशक व खतांचा अती वापर कमी केला पाहिजे. वेळोवेळी माती व पाणी परिक्षण करून त्यानुसार पिकांचे नियोजन केले पाहिजे. आपण पाहतो की, कित्येक वर्ष जमिन पडीक राहिली तर त्याची उगवण क्षमता कमी होते. पावसाळ्यात अशा जमिनीची माती वाहून जावून ती खारवट होते. त्यामुळे जमिनीत माती टिकली पाहिजे. माती असेल तरच पीक घेता येईल. माती नापिक झाली तर उत्पादनात घट होईल.

डॉ.सुरेश दरेकर

Related Stories

No stories found.