
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात तापमानाचा (temperature) पारा अजूनही घसरलेला असून बोचऱ्या थंडीचा (cold) अनुभव जिल्हावासीय घेत आहे. निफाड (niphad) मध्ये रविवारी 6.3 अंश सेल्सिअस तर नाशिक (nashik) शहराचे तापमान 8.4 अंश सेल्सियस नोंदले गेले.
मकर संक्रांतीनंतर (makar sankranti) थंडीचे प्रमाण कमी होते असा अनुभव आहे. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने अजूनही पुढील काही दिवस थंडीचे प्रमाण वाढतेच राहणार आहे. मुंबई (mumbai), कोकणसह (Konkan) संपूर्ण महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात सरासरीपेक्षा २-३ डिग्रीने घसरण होऊन थंडी (cold) जाणवत आहे. पुढील ३ दिवसात म्हणजे सोमवार दि.१६ ते बुधवार दि.१८ जानेवारी पर्यन्त किमान तापमानात अधिक घसरण होऊन अधिक थंडी महाराष्ट्रात (maharashtra) जाणवणार आहे, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist Manikrao Khule ) यांनी व्यक्त केला आहे.
विशेषतः मुंबईसह (mumbai) संपूर्ण कोकणातील चार जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्र व सभोवतालच्या नाशिक (nashik), नंदुरबार (nandurbar), धुळे (dhule), जळगाव (jalgaon) जिल्ह्यात तसेच नगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात ठिकाणी सोमवार दि. १६ जानेवारीपासुन पुढील ३ दिवस म्हणजे बुधवार दि. १८ जानेवारीपर्यंत काहीशी थंडीची लाटसदृश्य स्थिती जाणवेल.
या तीन दिवसात मात्र निरभ्र आकाश व सरासरीइतक्या जाणवणाऱ्या कमाल तापमानामुळे रात्रीच्या जाणवणाऱ्या थंडीबरोबरच दुपारच्या तापमानामुळे ऊबदारपणा जाणवेल व दिवसा थंडी सुसह्य होईळ. सध्या पास होत असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबरच बुधवार दि.१८ जानेवारीपासून नवीन येणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम उत्तर भारतातील हिमालयीन क्षेत्रात जाणवेल.
सध्या मध्य भारतात प्रभावित असलेल्या हवेच्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या परीघ क्षेत्र महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला काहीसा अटकाव जाणवत आहे.अन्यथा थंडीच्या लाटेचा अधिक प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असता. म्हणून सध्या केवळ सुसह्य थंडी जाणवत आहे.