Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशाळांची घंटा आज खणखणार

शाळांची घंटा आज खणखणार

नाशिक । प्रतिनिधी

करोना महामारीमुळे तब्बल अकरा महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’ असलेल्या शाळांची घंटा सोमवारी (दि.4) खणखणार आहे.शहरासह जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. यामुळे शाळांचा परिसर गजबजणार आहे.इंग्रजी आणि गणित याविषयांसाठी केवळ सलग तीन तास शाळा भरवण्यात येणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

नियमितपणे शाळा सुरु ठेवली जाणार नसून केवळ तीन तासांमध्ये इंग्रजी व गणित विषय शिकवले जातील. शिक्षण विभागाने 10 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या आधारे शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना करुनच शाळा सुरु कराव्या अशा सूचना आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमत्तीपत्रही घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांचेही पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शिक्षणाधिकार्‍यांच्या सूचना

स्थानिक परिस्थिती विचारात घेवून शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यानंतरच शाळा सुरु कराण्याच्याही सूचना माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

7197 शिक्षकांची करोना चाचणी

सोमवारी शाळा सुरु होणार असल्याने जिल्ह्यातील 7197 शिक्षकांची करोना चाचणी घेण्यात आलेली आहे. यामध्ये 3881 शिक्षकांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 25 शिक्षक हे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये इगतपुरी (३), सिन्नर (२), नाशिक, देवळा, पेठ (१), मालेगाव (3), दिंडोरी (2) चांदवड (५), त्र्यंबकेश्वर (२), येवला (५) येथील शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना शाळेत येण्यात बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या