Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशाळेची घंटा आजपासून वाजणार

शाळेची घंटा आजपासून वाजणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाचे 2023-24 हे शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत असून विदर्भ वगळता राज्याच्या सर्व भागातील शाळेची घंटा वाजून शाळेचा परिसर गजबजून जाणार आहे.

- Advertisement -

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यात आले असून सर्व विषयांसाठी एकच पुस्तक घेऊन विद्यार्थी आज शाळांची पायरी चढणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या मुलांसाठी हा निर्णय लागू असेल.त्याचसोबत सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असणार आहे. मुलांना स्काय ब्लू रंगाचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू रंगाची पँट तसेच मुलींना स्काय ब्ल्यू रंगाचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू रंगाचा फ्रॉक असा हा गणवेश असणार आहे.

राज्यातील स्वयंअर्थसहायित आणि ज्यांना अनुदान जाहीर झालेले नाही अशा शाळा वगळता इतर सर्व शाळांना पाठयपुस्तकांबाबतचा निर्णय लागू असेल. आतापर्यंत 4. कोटी 39 लाख पुस्तके वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सर्व विषयांसाठी मिळून एकच पाठयपुस्तक असणार आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाल्याचे सांगून दीपक केसरकर म्हणाले, या एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ देण्यात आले आहेत. प्रत्येक तिमाहीसाठी एक यानुसार चार टर्मसाठी चार पुस्तके असणार आहेत. या चार पुस्तकांचे मोफत वाटप केले जाणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळणार आहेत.

त्याचसोबत एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना एकच गणवेश असणार आहे. या वर्षी गणवेशाचा निधी शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र पुढच्या वर्षापासून महिला बचतगटांना प्रशिक्षण देउन त्यांच्याकडून हा गणवेश शिवून घेण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

मुलांना गणवेशासोबतच बूट आणि सॉक्स देखील येत्या महिन्याभरात देण्यात येतील. तसेच मुलांमध्ये सेवेची भावना वाढीला लागावी म्हणून स्काऊट आणि गाईड इयत्ता पहिलीपासूनच बंधनकारक करण्यात येणार आहे. खरी कमाईच्या माध्यमातून मुलांमध्ये सेवेची भावना रूजविता येईल.

दीपक केसरकर, शिक्षण मंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या