शाळांची घंटा सोमवारी खणाणणार

शाळांची घंटा सोमवारी खणाणणार
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यातह Nashik District करोना रुग्णांची corona Patients संख्या घटल्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार (दि.4) पासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ZP Schools एक हजार 93 तर, खासगी शिक्षण संस्थांच्या एक हजार 709 शाळा अशा एकूण 2802 शाळा भरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गट शिक्षणाधिकार्‍यांना या संदर्भात आदेश दिले आहेत.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याच धर्तीवर शहरासह ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 2802 शाळा असून, एकूण तीन लाख 6 हजार 914 विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांचे 14 हजार 580 शिक्षक आहेत. त्यांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

शहरात 227 शाळा

शहरातील 227 शाळा सुरू होतील. यामध्ये साधारणत: एक लाख 10 हजार विद्यार्थी आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील व महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी शहरातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील. एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल. ज्या शाळामध्ये सकाळी व दुपारी अशा पद्धतीने शिफ्ट करणे शक्य असेल त्यांनी तो पर्यायही निवडण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व उपाययोजना करुन जिल्ह्यातील शाळा सुरू होतील. करोना रुग्ण आढळल्यास त्याठिकाणी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

- अनिल शहारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com