..अन् तिरंग्याला कडक सलाम ठोकला

विजय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त युद्धाच्या आठवणी
..अन् तिरंग्याला कडक सलाम ठोकला
संग्रहित छायाचित्र

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

16 डिसेंबर सायंकाळी 5:30 वाजता पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करून भारतीय सैन्यदलाचे लेफ्टनंट जनरल अर्जुन सिंह अरोरा Lieutenant General Arjun Singh Arora यांच्यासमोर शस्त्र खाली ठेऊन शरणागती पत्रावर सही केली आणि संपुर्ण देशासह नव्याने तयार झालेल्या बांग्लादेशात Bangladesh आनंदोत्सव साजरा झाला.

आम्ही आमच्या स्पॉटवर काम करत होतो, कुठार या पाणबुडीविरोधी जहाजात मिडशिपमन या पदावर सेवा बजावत होतो. आमच्या डेकवर ही वार्ता समजताच आम्ही काम करत असताना आपल्या तिरंग्याकडे अभिमानाने बघत सलाम केला. 13 दिवस अहोरात्र चाललेल्या या युद्धाचा शेवट असा आनंददायी झाला होता. हे बोल आहेत 50 वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या भारत -पाक युद्धात सेवा बजावलेल्या नुकतीच वयाची 71 वर्षे पार केलेल्या कमांडर विनायक शंकर आगाशे Commander Vinayak Shankar Agashe यांचे. या युद्धात त्यांनी मिडशिपमन म्हणून कुठारी या पाणबुडीविरोधी जहाजात सेवा बजावली होती. त्यांना या युद्धात उत्कृष्ट कामगिरी म्हणून विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात देखील आले होते.

तसे बघितले तर 16 डिसेंबर हा दिवस प्रत्येक भारतीय संरक्षण दलाच्या Indian Defense Forces जवानाच्या तसेच बांग्लादेशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.1971मध्ये याचदिवशी भारताने पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळवला आणि बांग्लादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती केली. पाकिस्तानला नाटो देशांचा तसेच अमेरिकेच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा आधार होता, त्याचवेळी भारताला जुने शस्त्र आणि दुर्दम्य इच्छाशक्ती, कणखर नेतृत्व यांचा आधार होता.

या युद्धाला तशी सुरुवात 25 मार्च 1971 मध्येच झाली होती. पश्चिम पाकने ऑपरेशन सर्चलाइट सुरु करुन पूर्व पाकिस्तानमधील आंदोलनकर्त्यांचे अनन्वित अत्याचार सुरु केले होते. यातूनच आंदोलनकर्त्यांनी बांग्लादेश मुक्ति वाहिनी नावाने संघटना उभारून पाक सैन्याविरुद्ध तोंड देण्यास सुरुवात केली. भारताने बांग्लादेश मुक्ति वाहिनीला मदत पुरविली.

याच वर्षी डिसेंबर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कोलकाता येथे सभा सुरु असताना पाक सैन्याने भारतीय हवाई तळांवर हल्ले सुरु केले. पंतप्रधान गांधी तातडीने दिल्लीच्या दिशेने निघाल्या पण दिल्लीमध्ये ब्लॅकआउट असल्याकारणाने त्या दिल्लीमध्ये पोहचू शकल्या नाहीत. लखनऊ येथून त्यांनी सर्व सूत्र हलवण्यास सुरुवात केली. आणि अखेर 3 डिसेंबर रोजी भारत-पाक युद्धाचा नगारा वाजला. पाकिस्तानने यात भारतीय 11 हवाई तळांवर हल्ले केले.

भारताने पूर्वेकडे बांगलादेश मुक्ती वाहिनीला मदत तर पश्चिमेकडे आर्मीद्वारे आक्रमण असा पवित्रा घेतला. त्यामुळे सलग 13 दिवस-रात्र चाललेल्या युद्धात पाकिस्तान सैन्याला हार पत्करावी लागली. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कालांतराने बांगलादेशाचे निर्माता शेख मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. 10 जानेवारी 1972 रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.

3 डिसेंबरला सुरू झालेले भारत-पाकिस्तानमधील हे तिसरे युद्ध 16 डिसेंबरला संपले खरे पण या दोन देशांमधील वैमनस्य मात्र आजही संपलेले नाही. कारगिलची घुसखोरी व वारंवार होणार्‍या घातपाताच्या घटना पाहता हे वैर इतक्यात संपण्याची शक्यताही नाही. 1971च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सवी विजय दिन 1971 War Golden Jubilee Victory Day साजरा करताना सीमांवर सदैव दक्ष राहणार्‍या भारतीय जवानांना मानाचा सलाम !

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com