एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार

भुसावळचे आ. सावकारे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र
एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार

जळगाव : jalgaon

कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये (Karjat-Jamkhed Constituency) युती सरकारच्या (coalition government)कळात मंजुर (approved) झालेले राज्य राखीव पोलिस बल गट प्रशिक्षण केंद्र (State Reserve Police Force Group Training Centre) त्याच काळात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात हलविण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Govt) सरकार आल्यानंतर आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी हे केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यातील (Jamkhed Kusdgaon) कुसडगाव येथे आणले. मधल्या काळात त्याचे कामही सुरू झाले. मात्र, आता सत्तांतर झाल्याने हा प्रकल्प पुन्हा जळगाव जिल्ह्यात हलविण्याच्या (Project again in Jalgaon District) हालचाली सुरू (Start moving) झाल्या आहेत.

आ. संजय सावकारे
आ. संजय सावकारे

भुसावळचे भाजपाचे आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांनी हे केंद्र वरणगावला आणावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानुसार फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना कामाच्या सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार
कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या
एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार
VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

यावर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी आमदाराला कामाचे श्रेय जाऊ नये, म्हणून असा निर्णय होणार असेल तर भाजपचे हे विकास विरोधी राजकारण आहे, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार
आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव
एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार
तालुका पोलिसांकडून गावठी दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त

त्यांनी सीआरपीएफ सेंटरसाठी पाठपुरावा करावा- सावकारे

मुळात कर्जत येथे सीआरपीएफचे सेंटर मंजूर होते. राज्यपालांनी मंजूरी देऊन शासन निर्णय झाल्यानंतरही वरणगावचे केंद्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन त्यांनी ते पळविले होते. आमचा विकासाला विरोध नाही. त्यांनी त्यांच्याकडे मंजूर असलेल्या सीआरपीएफ केंद्रासाठी पाठपुरावा करावा असा टोला भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी लगावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com