यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण : न्या. जगमलानी

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik Collector Office

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शासन यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक केलेला कामांमुळेच सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ (Benefit of Government Schemes) मिळत असतो.

त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना (Govt Scheme) पोहचविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी (Chief District and Sessions Judge S. D. Jagmalani) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील भवन येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority) व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game), जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.), पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare), जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, धर्मदाय सह आयुक्त टी. अकाली, उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, वासंती माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह विधी क्षेत्रातील विधी अधिकारी व इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

विधी सेवा प्राधिकरणाच्या (Legal Services Authority) वतीने घेण्यात येणार्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या वर्षभरात 491 लोकांना व 260 बंदींना मोफत विधी सेवा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मध्यस्थीच्या प्रक्रियेद्वारे 457 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून लोकअदालतीच्या मार्फत साधारण 60 हजार 896 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे येत्या 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा (National Lok Adalat) लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही जगमलानी यांनी केले.

सेवकांनी कामाचा आनंद गमे

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नागरिकांसाठी असलेल्या सेवा त्यांना विहीत वेळेत मिळाल्यास त्यांना समाधान मिळते आणि विहीत वेळेत केलेल्या कामाचा आनंद अधिकारी- कर्मचारी यांनी घ्यावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना सुलभपणे लाभ मिळण्यासाठी प्रत्येक यंत्रणा आपापल्या चौकटीत राहून काम करावे. या शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या निमित्ताने विविध नवनवीन संकल्पना यांची चर्चा होते आणि त्यातून सर्व शासकीय यंत्रणामध्ये समन्वय साधला जात असतो. यामुळे नागरिकांना सर्व योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळण्यासाठी देखील मदत होते.

या योजनांचा लाभ

जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने किसान क्रेडीट कार्ड, मुद्रा कर्ज योजना, प्रधानमंत्री रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री रोजगार हमी कर्ज योजना, बचतगट कर्ज पीएम स्वनिधी कर्ज योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला.तहसिल कार्यालयाच्या वतीने रेशन कार्ड वाटप, जातीच्या व उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटपमहानगरपालिकेच्या वतीने पीएम स्वनिधी योजनेचा लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप .जिल्हा परिषदेच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग कार्ड, बचतगट कर्ज, मनरेगा जॉब कार्डचे प्रातिनिधीक वाटप .कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग यांचा लाभ देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com